आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- भारताने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मालिका विजय साकारला. भारताच्या 3 विकेट्स झटपट पडल्यानंतरही चेतेश्वर पुजारा खंबीरपणे उभा राहिला. अखेर कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या साथीने विजय साकारला. धोनीने लियॉनला चौकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले. चेतेश्वर पुजारा 82 धावांवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियावर चौथ्या कसोटीत विजय मिळवून भारताने मालिका 4-0 अशी जिंकली. भारताने 4-0 अशी मालिका प्रथमच जिंकली आहे. त्यामुळे हा विजय भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला. तसेच ऑस्ट्रेलियालाही तब्बल 54 वर्षांनी व्हाईटवॉश मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेने 1969-70मध्ये कांगारुंना व्हाईटवॉश दिला होता. त्यावेळी अली बाकर दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार होते.
पुजाराचे झुंझार अर्धशतक
मुरली विजय बाद झाल्यानंतर पुजाराने विराट कोहलीच्या साथीने भारताला विजयाच्या जवळ नेले. कोहली बाद झाल्यानंतर सचिन आणि रहाणेही आल्यापावली परतले. त्यावेळी प्रचंड दडपण आले होते. परंतु, पुजारा एका बाजुने खंबीर होता. त्याने कोणताही दबाव स्वतःवर येऊ दिला नाही. अप्रतिम फलंदाजी करीत त्याने भारतचा ऐतिहासिक विजय साकारला. त्याने 82 धावांची बहारदार नाबाद खेळी केली.
विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांना नॅथन लियॉनने बाद केले. सचिनल त्याने एका धावेवर पायचीत केले. तर विराटही 41 धावांवर पायचीत झाला. तर सचिननंतर आलेला रहाणे उंचावरुन फटका मारण्याच्या नादात मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर धोनीचाही एक झेल यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने सोडला. त्यावेळी काहीसे दडपण वाढले होते. परंतु, पुजारा एका बाजुने भक्कमपणे उभा राहिला. त्याने पहिल्या डावात अर्धशतक ठोकले होते. त्यानंतर आता दुस-या डावात नाबाद 82 धावांची अतिशय महत्त्वाची खेळी त्याने केली.
मुरली विजयने मुर्खपण करुन बेजबाबदार फटका मारण्याच्या नादात स्वतःची विकेट फेकली. परंतु, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीने दमदार फलंदाजी करुन भारताला विजयाच्या जवळ नेले. दोघांनी शतकी भागीदारी केली. परंतु, अर्धशतकाच्या जवळ पोहोचला असताना विराट कोहली बाद झाला. लियॉनने त्याला पायचीत केले. विराट कोहलीने 41 धावा काढल्या. तर पुजारानेही दमदार अर्धशतक पूर्ण केले.
उपहाराला खेळ थांबला त्यावेळी भारताची 1 बाद 71 अशी स्थिती होती. पुजारा आणि कोहलीने बहारदार फटकेबाजी करुन 6 च्या सरासरीने धावा काढल्या.
.
ऑस्ट्रेलिया दुस-या डावात 164 धावांमध्येच गारद
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 164 धावांमध्येच आटोपला असून भारताला विजयासाठी 155 धावांचे आव्हान आहे. हा सामना जिंकून प्रथम ऑस्ट्रेलियाला 4-0 असा व्हाईटवॉश देण्याची संधी भारताला आहे.
आर. अश्विनने पीटर सिडलला बाद करुन ऑस्ट्रेलियाचा डाव संपविला. परंतु, सिडलने झुंझार 50 धावा करुन भारताची चिंता वाढविली. त्याने मॅथ्यू वेड आणि पॅटिंसनसोबत महत्त्वाच्या भागदा-या करुन आघाडी 150 च्या वर नेली. अखेरच्या डावात या खेळपट्टीवर हे आव्हान खडतर ठरु शकते.
रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचे 5 फलंदाज बाद केले. आर. अश्विन आणि प्रग्यान ओझाने 2 तर इशांत शर्माने 1 बळी घेतला. सिडलने सर्वाधिक 50 धावा काढल्या. त्यानंतर कोवानने 24, मॅथ्यू वेडने 19 तर स्टीव्ह स्मिथने 18 धावा केल्या. पॅटिंसननेही 11 धावा काढून योगदान दिले. याव्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.