आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
मुंबई - रणजी करंडकाच्या फायनलमध्ये वसीम जाफरच्या शतकी (132) खेळीच्या बळावर मुंबईने पहिल्या डावात सौराष्ट्र विरुद्ध महत्त्वपूर्ण अशी 139 धावांची आघाडी घेतली. सामन्याच्या दुस -या दिवसअखेर मुंबईने 6 बाद 287 धावा काढल्या.
मुंबईच्या गोलंदाजांनी सौराष्ट्रला पहिल्या डावात 148 धावांत गुंडळाले होते. मुंबईकडून वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने 24 धावांत 4 गडी बाद केले. अभिषेक नायर आणि दाभोळकर यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात मुंबईने दमदार सुरुवात केली. जाफर व कौस्तुभ पवारने 75 धावांची सलामी दिली. कौस्तुभ 21 धावा काढून बाद झाला. तारे अवघ्या 3 धावा काढून तंबूत परतला. सचिन व जाफरने तिस -या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.