आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनिवासन यांची खुर्ची शाबूत; दालमियांकडे हंगामी अध्‍यक्षपद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्‍नई- बीसीसीआयचे अध्‍यक्ष एन. श्रीनिवासन यांनी मंडळाच्‍या बैठकीत खुर्ची न सोडता फक्‍त स्‍वत:ला त्‍या पदापासून वेगळे केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार ते सुट्टीवर जाणार आहेत. आता जगमोहन दालमिया आणि निरंजन शहा या दोघांच्‍या कार्यकारी संघटनेचे प्रमूख दालमिया असतील. आणि यांची समितीच सर्व निर्णय घेईल. अरूण जेटली आणि अनुराग ठाकूर यांनी दालमिया यांच्‍या नावाचा प्रस्‍ताव दिला होता.

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, ही बैठक गोंधळामुळे दोनवेळा थांबवण्‍यात आली. अजय शिर्के बैठक सुरू असतानाच उठून गेले. बैठकीनंतर पोलिसांनी तेथून माध्‍यमांना हटवले. बैठकीत आपल्‍याशिवाय श्रीनिवासन यांच्‍या राजीनाम्‍याची कोणीच मागणी केली नसल्‍याचे बीसीसीआयचे माजी अध्‍यक्ष आयएस बिंद्रा यांनी सांगितले.

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, सप्‍टेंबर महिन्‍यात होणा-या मंडळाच्‍या निवडणुकीपर्यंत दालमिया बीसीसीआयची धुरा सांभाळणार आहेत. आयपीएल फिक्सिंग आणि सट्टेबाजीची पूर्ण चौकशी होईपर्यंत श्रीनिवासन यांच्‍या कोणतेच अधिकार राहणार नाहीत.


आयएस बिंद्रा यांनी बैठकीत श्रीनिवासन यांच्‍याविरोधात आरोपांच्‍या फैरी झाडत त्‍यांना पद सोडण्‍यास सांगितले. श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्‍याऐवजी किंवा आयपीएल फिक्सिंगप्रकरणाची चौकशी होण्‍यापर्यंत श्रीनिवासन यांच्‍या सुट्टीवर जाण्‍यावरूनही मोठा वाद झाला. मंडळातील अनेक सदस्‍यांना श्रीनिवासन यांचा राजीनामा हवा होता. बीसीसीआयच्‍या घटनेत हंगामी अध्‍यक्षासारखे पद नसून त्‍यांना नेमले तर ते बेकायदेशीर ठरेल, माहितगारांनी म्‍हटले.

अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...