आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शमी सामना जिंकून देणारा गोलंदाज - जहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑकलंड - अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडचा दुसरा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा मोहंमद शमी हा भारताला सामना जिंकून देणारा गोलंदाज असल्याचे मत भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जहीर खान याने व्यक्त केले आहे.
स्विंग आणि सीम गोलंदाजीचे अप्रतिम प्रात्यक्षिक दाखवत त्याने न्यूझीलंडचे तीन बळी अवघ्या 37 धावांत घेतल्यानेच न्यूझीलंडचा दुसरा डाव 105 धावांमध्ये उखडता आल्याचेही जहीर म्हणाला. तो ‘मॅचविनर’ गोलंदाज असल्याबाबत माझ्या मनात यत्किंचितही संदेह नाही. जशी त्याच्या अनुभवात वाढ होईल, तसा तो अधिकाधिक चांगला गोलंदाज बनत जाईल, असेही जहीर म्हणाला. दुस-या डावात भारताच्या क्षेत्ररक्षकांनीदेखील काही अप्रतिम झेल टिपल्याने खूप फरक पडल्याचेही जहीरने सांगितले. भारतापुढे 408 धावांचे लक्ष्य असले तरी भारत हा सामना जिंकू शकतो, असेही जहीर म्हणाला.