आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaipur Cricketer Vivek Breaks One Day World Record!

वनडेमधील वैयक्तिक स्‍कोअरचा नवा विश्‍वविक्रम, जयपूरच्‍या विवेकने बनवल्‍या 287 धावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- राजस्‍थान टीमला रणजीमध्‍ये पहिल्‍यांदा चॅम्पियन बनवण्‍यात महत्‍वाची भूमिका निभावणा-या फिरकीपटू विवेक यादवने सोमवारी आपल्‍या बॅटने नवा विक्रम रचला आहे. माजी रणजी क्रिकेटपटू शमशेर सिंग यांच्‍या स्‍मृतीनिमित्त सुरू असलेल्‍या टुर्नामेंटमध्‍ये विवेकने 287 धावांची विक्रमी खेळी केली. मर्यादित ष्‍ाटकांच्‍या सामन्‍यातील हा सर्वात मोठा वैयक्तिक स्‍कोअर ठरला आहे. विवेकने गोलंदाजीतही कमाल करताना अवघ्‍या एका धावेत 7 विकेट घेतल्‍या.

त्‍याच्‍या या कारनाम्‍याला जर आंतरराष्‍ट्रीय मान्‍यता मिळाली तर अधिकृतरित्‍या तो जागतिक विक्रम ठरेल.

सलामीला फलंदाजीस आलेला विवेक 43व्‍या षटकांत पुल शॉट खेळताना बाद झाला. जर तो 50 षटकांपर्यंत क्रीजवर राहिला असता तर निश्चितपणे त्‍याने 300 धावा पार केल्‍या असत्‍या. अ वर्गाच्‍या श्रेणीत सर्वोत्तम कामगिरी एडी ब्राऊन (268) आणि वनडेमध्‍ये सेहवाग (219) यांच्‍या नावे आहे.

कर्णधार विवेकच्‍या फलंदाजीमुळे त्‍यांची टीम अरावली क्‍लबने 8 बाद 512 धावा बनवल्‍या. मर्यादित षटकांच्‍या सामन्‍यातील ही सर्वोच्‍च धावसंख्‍या ठरली. पहिल्‍यांदा एखाद्या टीमने 500 धावांचा टप्‍पा पार केला. अ श्रेणीच्‍या सामन्‍यातील सर्वोच्‍च धावसंख्‍या सरे टीमच्‍या नावावर आहे. या टीमने 29 एप्रिल 2007 रोजी ग्‍लोकस टीमविरोधात 4 बाद 496 धावा केल्‍या होत्‍या. आंतरराष्‍ट्रीय वनडेमधील सर्वोत्‍कृष्‍ट धावसंख्‍या श्रीलंकेच्‍या नावे आहे. जुलै 2007मध्‍ये त्‍याने हॉलंडविरोधात 9 बाद 443 धावा केल्‍या होत्‍या.