आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय कंपनीने बनवले क्रिकेटचे खास हेल्मेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर - बाउन्सर लागल्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू फिलिप ह्यूजचा मृत्यू झाल्यानंतर क्रीडा साहित्य उत्पादन करणार्‍या कंपन्या नवनवीन हेल्मेट तयार करत आहेत. जालंधर येथील अ‍ॅडव्हान्स कंपोझिट कंपनीनेदेखील नवे हेल्मेटचे तयार केले असून ते पेटंटसाठी पाठवले आहे. कंपनीचे एमडी राजन कोहली यांनी सांगितले की, आमच्या कंपनीने २०११ आणि २०१३ ला आयसीसीने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हेल्मेट बनवले. आयसीसीकडून त्याला प्रमाणपत्रदेखील मिळाले. श्रेय नाव असलेल्या हेल्मेटचे वजन ७५० ग्राम आहे. कंपनीने या हेल्मेटला पाठीमागून अर्धा इंच लांब केले असून त्यामुळे गळ्याचा भाग सुरक्षित होतो, असा दावा कंपनीने केला आहे.