आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jamaican Sprinter Usain Bolt To Visit India To Play Cricket

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोल्ट आज केट खेळणार, दुपारी वाजता होणार प्रत्येकी षटकांचा सामना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - जगातला सर्वाधिक वेगवान धावपटू जमैकाचा युसेन बोल्ट मंगळवारी भारतीय प्रेक्षकांसमोर क्रिकेट खेळणार आहे. बोल्ट मंगळवारी येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय स्टार युवराजसिंग आणि जहीर खानसारख्या दिग्गजांसोबत एका मैत्रीपूर्ण सामन्यात खेळणार आहे.

वर्ल्ड आणि ऑलिम्पिक चॅम्पियन बोल्ट सात खेळाडूंच्या संघाकडून खेळेल. या सामन्यात युवराजसिंगसमवेत देशातील आघाडीचे खेळाडू खेळतील. बोल्टच्या संघात त्याचा जिवलग िमत्र नुगे वॉकर ज्युिनयर, भारताचा महान ऑफस्पिनर हरभजनसिंग यांचा समावेश आहे. युवराजच्या संघात त्याचा िमत्र जहीर खानचा समावेश आहे. हा चार षटकांचा सेव्हन-अ-साइड सामना असेल. या कार्यक्रमाचे आयोजन एका कंपनीकडून करण्यात आले असून माजी िक्रकेटपटू अजय जडेजाच्या देखरेखीखाली हा सामना होईल. दोन्ही संघात एका तज्ज्ञ यष्टिरक्षकाचा समावेश आहे.