लंडन - आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीपुढील सुनावणीनंतर इंग्लंडच्या गोलंदाज जेम्स अँडरसनला सोडून दिले जाऊ शकले असते. मात्र त्याने पहिल्या कसोटीदरम्यान जडेजाला शिवीगाळ केल्याचे समितीपुढे मान्य केले असल्याचा दावा एका क्रीडा वृत्तवाहिनीने केला आहे.
कबुलीजबाबात त्याने जडेजाला दात तोडून टाकण्याची धमकी दिल्याचे कबूल केले असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे याबाबत अधिक चौकशीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने न्याय आयुक्तांची नेमणूक केली आहे. या कबुलीजबाबात अँडरसननने जडेजाला ढकलल्याचे तसेच शिवीगाळ करताना असभ्य वर्तणूक केल्याचेही सांगितल्याची माहिती दिली. तुझे वागणे क्रिकेटसाठी अहितकारक होते, असे वाटते का ? विचारल्यावर अँडरसनने स्वत:हून ‘हो’ असे उत्तर दिल्याचेही क्रीडा वृत्तवाहिनीने म्हटले आहे. जडेजाचा कॅच घेतल्याचे अपील अँडरसनने केल्यानंतर त्याने जडेजाशी बाचाबाची केली. पंच बु्रसने मध्यस्थी करून अँडरसनला समज दिली होती, असा दावा करण्यात आला आहे.