आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवींद्र जडेजा, अँडरसन निर्दोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साऊदम्प्टन - मालिकेतील पहिल्या कसोटीत रंगलेल्या वादात भारताचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांमधील ट्रेंटब्रिज येथील पहिल्या कसोटीतला वाद चांगलाच रंगला होता. मात्र, न्यायमूर्ती गोर्डन लुईस यांनी सहा तासांपर्यंत चाललेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या प्रकरणाची सुनावणी केली. या वेळी त्यांनी जडेजा आणि अँडरसन हे दोघेही निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला. या वेळी झालेल्या वादात दोन्ही खेळाडूंकडून आयसीसीच्या आचारसंहितेचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झाले नाही, असेही त्यांनी या वेळी सुनावणीत स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून रंगलेल्या या वादावर शुक्रवारी पडदा पडला.

‘गोर्डन यांनी या वेळी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे हा निर्वाळा दिला आहे. शिवीगाळ करून जडेजाला धक्का दिल्याचा आरोप इंग्लंडच्या खेळाडूवर लावण्यात आला होता, अशी माहिती आयसीसीच्या सुत्रांनी दिली.