आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन- जेम्स बाँडची भूमिका वठवणारा हॉलीवूडचा स्टार डॅनियल क्रेग आगामी लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहणार आहे. तो बाँड स्टाइलने स्टेडियममध्ये प्रवेश करून प्रेक्षकांना रोमांचित करणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या वेळी क्रेग हेलिकॉप्टरमधून उडी मारून ऑलिम्पिक स्टेडियममध्ये पोहोचणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्याशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 जुलै रोजी होणा-या या कार्यक्रमाची जबाबदारी चित्रपट निर्माते डॅनी बॉयल यांना देण्यात आली आहे. ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटाच्या वेळी बॉयल चर्चेत आले होते. उद्घाटन सोहळ्याला थरारक करून संपूर्ण जगाला आकर्षित करण्याचा त्यांचा पूर्ण प्रयत्न राहणार आहे. त्यांनी यासाठी एक फिल्म बनवली आहे. यात क्रेग झळकणार आहे. मार्च महिन्यात या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली. क्रेगला उद्घाटन सोहळ्यात सामील होण्यास राणी एलिझाबेथ यांनी सांगितले होते. चित्रपटाच्या शूटिंगसाठी क्रेग आणि बॉयल यांना बकिंगहॅम पॅलेस येथे जाण्याची परवानगी मिळाली होती.
ऑलिम्पिकचा सोहळा माझ्यासाठी एक मोठे आव्हान आहे. मी हे आव्हान पेलण्यास समर्थ आहे. मी यासाठी पूर्ण प्रयत्न करीत आहे. मी माझ्या शैलीचे नॉवल फ्रँकेस्टाइन यांच्याकडून प्रेरणा घेऊन कार्यक्रमाची तयारी केली आहे. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांशिवाय टीव्हीवर पाहणारे जगभरातील प्रेक्षक हा सोहळा बघून चकित होतील याची मला खात्री आहे, असे एका मुलाखतीत बॉयल यांनी म्हटले.
भारतीय मल्लांना सुमार दर्जाचे जेवण
नवी दिल्ली । सोनिपत येथे ऑलिम्पिकला जाणा-या मल्लांचे शिबिर सुरू आहे. या शिबिरात खेळाडूंना सडलेले जेवण वाढण्यात आल्याची तक्रार झाली आहे. भारताचे माजी चॅम्पियन जलतरणपटू आणि क्रीडा मंत्रालयाच्या देखरेख समितीचे सदस्य खजानसिंग यांनी ही माहिती दिली. खेळाडूंना ज्या फळांचा रस दिला जात होता, ते अतिशय सुमार दर्जाचे होते. अतिशय घाण स्वयंपाकघरात सडलेल्या फळातून हे रस तयार करण्यात येत होते. जेवणाची तपासणी करण्यासाठी या वेळी शिबिरात एकही डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञ उपस्थित नव्हता, असे त्यांनी म्हटले. या शिबिरात सुशीलकुमारही उपस्थित आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.