आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपान ओपन: अजय जयराम विजयी; सिंधूचा पराभव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो - जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेती पी. व्ही. सिंधूचे जपान ओपनमधील आव्हान संपुष्टात आले. जपानच्या ही अकाने यामागुचीने महिला एकेरीत सिंधूचा 21-6, 21-17 ने पराभव केला. दुसरीकडे पुरुष गटात भारताचा अजय जयराम, के. श्रीकांत व प्रणवने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली .


प्रवण 53 मिनिटांत विजयी
पुरुष एकेरीत प्रणवने अवघ्या 53 मिनिटांत सामना जिंकला. त्याने डेन्मार्कच्या जॉन ओ जोरगेनसनचा पराभव केला. त्याने लढतीत 21-14, 13-21, 21-17 विजय मिळवला.


श्रीकांतचा सहज विजय
श्रीकांतने दुस-या फेरीत जपानच्या काजुतेरू कोजाईला पराभूत केले. त्याने 32 मिनिटात 21-12, 21-16 ने सामना जिंकला. यासह त्याने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.आनंद पवारकडून निराशा पुरुष एकेरीत भारताच्या आनंद पवारने निराशा केली. त्याला जगातील नंबर वन ली चोंग वेईने पराभूत केले. मलेशियाच्या खेळाडूने 21-12, 21-16 अशा फरकाने सामना जिंकला. दुसरीकडे मनू अत्री आणि सुमित रेड्डीलाही पराभवाचा सामना करावा लागला. या जोडीचा पुरुष दुहेरीत चीनच्या लियू जिया ओलांग व कियू जिहानने 21-17, 21-16 अशा फरकाने पराभव केला.
पराभवामुळे जागतिक क्रमवारीत सिंधुची 12 व्या स्थानावर घसरण झाली आहे.


जयरामची शर्थीची झुंज यशस्वी
भारताच्या अजय जयरामला रंगतदार लढतीत शर्थीची झुंज द्यावी लागली. त्याने सुरेख खेळी करून जपानच्या युईची इकेदाविरुद्ध सामना जिंकला. त्याने 21-13, 11-21, 21-18 ने विजय मिळवला. यासाठी त्याला 53 मिनिटे झुंज द्यावी लागली. त्याने लढतीत 12 स्मॅश विनर आणि 21 नेट विनर मारले. जयरामने सहजपणे पहिला सेट जिंकला. दुस-या गेममध्ये जपानच्या खेळाडूने पुनरागमन केले होती. मात्र, तिसरा गेम जयरामने जिंकला.