Home | Sports | Expert Comment | Jaspreet Bumrah Shows Anger On Police As They Used No Ball Picture Of Him

ट्रॅफिक पोलिसांनी वापरला 'त्या' नो-बॉलचा फोटो, भडकला ना जसप्रीत बुमराह

दिव्यमराठी वेब टीम | Update - Jun 24, 2017, 04:05 PM IST

जयपुर ट्रॅफिक पोलिसांनी एक नवा प्रयोग करत जसप्रीत बुमराहचा नो-बॉल वाला फोटो जाहीरात म्हणून वापरला.

 • Jaspreet Bumrah Shows Anger On Police As They Used No Ball Picture Of Him
  जयपूर पोलिसांनी जसप्रीत बुमराहचा तो नोबॉलचा फोटो टाकत नागरिकांत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
  स्पोर्ट्स डेस्क- जयपुर ट्रॅफिक पोलिसांनी एक नवा प्रयोग करत जसप्रीत बुमराहचा नो-बॉल वाला फोटो जाहीरात म्हणून वापरला. ज्यामुळे बुमराह भडकला आहे. ट्रॅफिक अवेयरनेससाठी तयार करण्यात आलेल्या या जाहीरातीत एकीकडे बुमराहचा लाईन क्रॉस करतानाचा फोटो आहे तर दुसरीकडे, झेब्रा क्रॉसिंगच्या मागे उभी असलेली कारचा फोटो दिला आहे. आणि त्यापुढे लिहले की, ही रेषा क्रॉस करू नका, हे महागाड पडू शकते. भडकला ना बुमराह...
  - हा फोटो व्हायरल होताच बुमराहने लिहले ट्विटरवर लिहले की, 'खूपच छान जयपूर ट्रॅफिक पोलिस. यावरून मला हे पाहायला मिळाले की, आपल्या देशासाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुमच्याकडून किती आदर मिळतो. मात्र, जयपूर पोलिसांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, 'ही माहिती केवळ ट्रॅफिक अवेयरनेससाठी आहे. आमचा उद्देश बुमराह किंवा लाखों क्रिकेट फॅन्सच्या भावना दुखवायच्या नव्हत्या.
  काय आहे 'नो-बॉल' प्रकरण-
  - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच पाकिस्तानी ओपनर फखर जमानला बाद केले होते. मात्र, नंतर तो नो-बॉल असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर फखर जमानने शतक ठोकले. ज्यानंतर पाकिस्तानने भारतला 339 धावांचे विशाल लक्ष्य दिले आणि भारताची टीम 158 धावात सर्वबाद झाली. मॅचनंतर क्रिकेट फॅन्सनी सुद्धा बुमराहवर त्याच्या या नो-बॉलवरून राग काढला होता.
  पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, बुमराहच्या या फोटोवरून सोशल मीडियात काय येत आहेत कमेंट्स...

 • Jaspreet Bumrah Shows Anger On Police As They Used No Ball Picture Of Him
  मात्र, यामुळे जसप्रीत बुमराह चांगलाच भडकला.
 • Jaspreet Bumrah Shows Anger On Police As They Used No Ball Picture Of Him
  यावर काहींनी जयपूर पोलिसांची बाजू त्यातील आशय समजून घेण्याचा प्रयत्न करावा असे म्हटले.
 • Jaspreet Bumrah Shows Anger On Police As They Used No Ball Picture Of Him
  तर काही जण बुमराहच्या बाजूला उभे राहिले.
 • Jaspreet Bumrah Shows Anger On Police As They Used No Ball Picture Of Him
  क्रिकेटरपेक्षा ट्राफिक पोलिस उन्हापावसात लोकांसाठी काम करतात असा काहींनी सल्ला दिला.
 • Jaspreet Bumrah Shows Anger On Police As They Used No Ball Picture Of Him
  काहींनी बुमराहची खिल्ली उडवणारी टि्वट केली.
 • Jaspreet Bumrah Shows Anger On Police As They Used No Ball Picture Of Him
  जयपूर ट्राफिक पोलिसांनी बुमराहला कोणाच्याही भावना दुखवण्यासाठी हेे कृत्य केलेले नाही असे सांगितले.

Trending