आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Javed Miandad News In Marathi, Shahid Afridi, Pakistan Cricket Team

आफ्रिदीलाच कर्णधार बनवा, जावेद मियाँदाद यांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - टी-20 विश्वचषकात भारताकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधार मोहंमद हाफिजवर टीकेची झोड उठली आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी शाहिद आफ्रिदीलाच कर्णधार करा, अशी मागणी माजी कर्णधार जावेद मियाँदाद आणि फलंदाज मोहंमद युसूफ यांनी केली आहे.


हाफिजने गोलंदाजांचा खुबीने वापर करायला हवा होता. आक्रमक क्षेत्ररक्षण रचावयास हवे होते. त्यामुळे भारतीय फलंदाजांची नाकेबंदी करता आली असती, असे मियाँदाद म्हणाला. धावा अडवल्या, बळी मिळवले की धावांचे अंतर वाढते. फलंदाजांवर दबाव वाढतो. कर्णधार हाफिज नेमका इथेच कमी पडला. भारतीयांना त्याला दबावात आणता आले नाही. गोलंदाजांचा अधिक प्रभावीपणे उपयोग करता आला असता, अशा शब्दांत तो पाक कर्णधारावर बरसला.
माजी फलंदाज मोहंमह युसूफने मियाँदादच्याच सुरात सूर मिसळला. हाफिजच्या देहबोलीवर त्याने हल्ला चढवला. चांगल्या नेतृत्व झाले असते, तर भारतीयांवर दबाव टाकता आला असता. मग 130 धावांचे आव्हानही टीम इंडियाला 160 धावांसारखे भासले असते. मात्र, असे घडले नाही, अशी तोफ त्याने डागली. या दोन्ही माजी फलंदाजांनी शाहिद आफ्रिदीच मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी कर्णधार म्हणून राइट चॉइस असल्याचे सांगितले. आफ्रिदी आक्रमक, सकारात्मक व जबाबदारी ओळखून तो खेळतो, अशी स्तुतिसुमने मियाँदादने उधळली. मोहंमद युसूफ म्हणाला, संघात ऊर्जा भरण्याचे काम आफ्रिदी करू शकतो.


...तरीही मियाँदाद म्हणतो, भारत-पाकमध्येच फायनल
भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांतच टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना होईल, असे भाकीतही मियाँदादने वर्तवले. पाकचे आव्हान अजून संपलेले नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे. फलंदाज अपयशी ठरल्याने ते हरले. कदाचित भारत-पाकमध्येच फायनल होईल, असे तो म्हणाला. पाकला तीन सामने खेळावयाचे आहेत. उपांत्य फेरीत भारत, पाक, विंडीज, ऑस्ट्रेलिया हे संभाव्य संघ असतील, असा दावाही त्याने केला.