आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Javed Miandad Sledged Injured Sachin Tendulkar In Debut Test Match

16 वर्षांच्‍या जखमी सचिनला मियांदाद मारत होता टोमणे- अजित तेंडुलकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर करिअरमधील 199व्‍या कसोटीसाठी कोलकाता येथे घाम गाळत आहे. 24 वर्षांच्‍या करिअरनंतर आजही तो 16 वर्षांच्‍या मुलासारखाच मैदानात उत्‍साहात असतो. 1989साली पाकिस्‍तानच्‍या अव्‍वल वेगवान गोलंदाजांचा सामना करताना तो ज्‍या आवेशात मैदानात दिसला होता. अगदी तसाच तो आजही प्रत्‍येक सामन्‍यात दिसून येतो.

कराची येथे झालेल्‍या पहिल्‍या कसोटीत वकार युनूसच्‍या बाऊंसरवर तो जखमी झाला होता. तो वेगवान चेंडू जसा त्‍याच्‍या चेह-यावर येऊन आदळला. त्‍यासरशी तो खाली पडला. त्‍याच्‍या नाकातून रक्‍त वाहत होते. परंतु, तरीही त्‍याने मैदान सोडले नाही.

आज पाकिस्‍तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद सचिनचे कितीही कौतुक करीत असला तरी 1989 साली जखमी झालेल्‍या 16 वर्षीय सचिनला फलंदाजी करताना तो टोमणे मारत होता.

हा खुलासा केला आहे. सचिनचा भाऊ अजित तेंडुलकर यांनी. इतक्‍या वर्षांनंतर पहिल्‍यांदाच त्‍यांनी आपल्‍या भावना सर्वांसमोर एका मुलाखतीत प्रकट केल्‍या. सचिनच्‍या निवृत्तीचा निर्णय हा संपूर्ण कुटुंबियांनी घेतलेला होता, असे ते म्‍हणाले. तो एकदम योग्‍यवेळी क्रिकेट सोडत असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा 16 वर्षीय जखमी सचिनशी पाकिस्‍तानी टीमची कशी होती वागणूक...