आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: आता घरच्या मैदानावर पुनरागमनाचा महेला जयवर्धनेला विश्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- आयपीएलच्या सहाव्या स्पर्धेत सलग पाच सामन्यांत पराभूत झाल्यानंतर आता घरच्या मैदानावर होणा-या पुढच्या सामन्यात पुनरागमनाचा विश्वास दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार महेला जयवर्धनेने व्यक्त केला आहे. आम्ही घरच्या मैदानावरील सामने जिंकले, तरीही आम्ही अंतिम चारमध्ये पोहोचू शकतो. आता घरच्या मैदानावरील सामने जिंकण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. यावरच आम्ही मेहनत घेत आहोत, असेही त्याने म्हटले.

पाचव्या सामन्यात दिल्लीला बंगळुरूने सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. सेहवाग अखेरच्या तीन षटकांत क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर नव्हता. यामुळे त्याला सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी पाठवता आले नाही, असे तो म्हणाला


* विराट कोहलीने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध तिसरे आणि आयपीएलमध्ये अकरावे अर्धशतक झळकावले.

* आयपीएल 2013 मध्ये तीनशे धावांचा टप्पा ओलांडणारा कोहली पहिला फलंदाज ठरला आहे. या सत्रात त्याने सहा सामन्यांत 64.20 च्या सरासरीने 321 धावा काढल्या.

* आयपीएलमध्ये विराटने चौथ्यांदा ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार जिंकला.

* बंगळुरू-दिल्लीचा सामना आयपीएलमधील चौथी टाय लढत ठरली. यापूर्वी कोलकाता-राजस्थान (23 एप्रिल 2009, केपटाऊन), चेन्नई-पंजाब (21 मार्च 2010, चेन्नई), सनरायझर्स हैदराबाद-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (7 एप्रिल 2013, उप्पल, हैदराबाद) या लढती टाय झाल्या आहेत.

* एकाच महिन्यात दोन सामने टाय पहिल्यांदा झाले.

* आयपीएलमध्ये 2000 धावा पूर्ण करणारा गेल सहावा फलंदाज ठरला आहे. गेलने 49 सामन्यांत 50.30 च्या सरासरीने 2012 धाव काढल्या आहेत. यापूर्वी 2 हजार धावा पूर्ण करणा-या पाच खेळाडूंत सुरेश रैना (2302), गौतम गंभीर (2300), रोहित शर्मा (2130), तेंडुलकर (2115), कॅलिस (2046) यांचा समावेश आहे.