आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jitu Rai Wins Gold, Gagan Narang Silver Latest News In Marathi

'पिस्‍तुल किंग' जीतू बनला 'वन मॅन आर्मी', राष्‍ट्रकुलमध्‍ये जिंकले 'सुवर्ण पदक'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्‍लासगो - पिस्‍तुल किंग म्‍हणून ओळखल्‍या जाणात्‍या जीतू रायने 20 व्‍या राष्‍ट्रकुल स्‍पर्धेच्‍या पाचव्‍या दिवशी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. पुरुष 50 मीटर पिस्‍तुल प्रकारातील अंतीम फेरीमध्‍ये भारताच्‍या जीतू रॉयने सुवर्ण तर गुरपाल सिंगने रौप्‍य पदक मिळविले आहे.

जीतू रॉयने बनविला विक्रम
लखनौचा स्‍टार नेमबाज जीतू रॉयने राष्‍ट्रकुल स्‍पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देवून नवीन किर्तीमान विक्रम प्रस्‍तापीत केला आहे. त्‍याने 50 मीटर एअर पिस्‍तुल प्रकारात 194.1 गुण मिळवून सुवर्णवेध घेतला आहे.एवढया गुणांनी सुवर्ण पदक आपल्‍या नावे करणारा तो एकमेव नेमबाज ठरला आहे. उपांत्‍यपूर्व फेरीमध्‍येही त्‍याने 562 गुण मिळवून किर्तीमान स्‍थापन केला होता.
2009 पासून सुरुवात
जीतूने राष्‍ट्रकुल स्‍पर्धेमध्‍ये मिळविलेल्‍या यशाबद्दल बोलताना म्‍हटले की, 'मी सैन्‍यामध्‍ये भरती झाल्‍यानंतर शुटिंगचा सराव करायला लागलो. सरावादरम्‍याने माझ्या वरिष्‍ठांकडून मला व्‍यावसायिक शुटर बनण्‍याचा सल्‍ला दिला. मला विश्‍वास वाटत नाही की, मी पाच वर्षांतच मी जगातील नंबर वन नेमबाज बनेन'.

महुमध्‍ये करतो सराव
जीतू मुळ लखनौचा असून सध्‍या महू (मध्‍यप्रदेश) मध्‍ये तो सराव करत आहे. भारतीय लष्‍करातील तो नेमबाज आहे. यापूर्वी अंजलि भागवत, राज्यवर्धन सिंह राठौड़, गगन नारंग, मानवजीत सिंह संधू, रोंजन सोढ़ी आणि हीना सिद्धू यांनी आपापल्‍या नेमबाजी प्रकारात अव्‍वल स्‍थान मिळवले होते.


विश्‍व चषकात दोन पदकांची कमाई
जीतू रायने आंतरराष्‍ट्रीय नेमबाजीमध्‍ये उत्‍कृष्‍ठ प्रदर्शन करत एअर पिस्‍तुल प्रकारात सुवर्ण पदकाची कामगिरी केली होती. तर फ्री स्‍टाइल प्रकारात 0.1 पॉईंटने त्‍याला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. विश्‍वचषकात दोन पदकं मिळविणार तो एकमेव भारतीय ठरला आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, जीतू रायची निवडक छायाचित्रे..