आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jitu Rai Wins Gold Gurpal Singh Silver In 50m Pistol Event, Latest News In Marathi

CWG : राष्ट्रकुल स्पर्धेत जीतू रॉयचा \'सुवर्ण वेध\' तर गुरुपाल सिंगचा \'रौप्‍य\'वर निशाणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्‍लासगो - 20 व्‍या राष्‍ट्रकुल स्‍पर्धेच्‍या पाचव्‍या दिवशी भारताला सुवर्ण पदक मिळाले आहे. पुरुष 50 मीटर पिस्‍तुल प्रकारातील अंतीम फेरीमध्‍ये भारताच्‍या जीतू रॉयने सुवर्ण तर गुरपाल सिंगने रौप्‍य पदक मिळविले आहे.
गगन नारंगला रौप्‍य
भारताचा स्‍टार नेमबाजपटू नेमबाज गगन नारंगने ५० मी. शुटींग प्रकारात रौप्‍य पदकाचा वेध घेतला आहे. नारंगने यापूर्वीही भारताला ऑलिम्पिकमध्‍ये पदक मिळवून दिले होते.
जीतू रॉयने बनविला विक्रम
लखनौचा स्‍टार नेमबाज जीतू रॉयने राष्‍ट्रकुल स्‍पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देवून नवीन किर्तीमान विक्रम प्रस्‍तापीत केला आहे. त्‍याने 50 मीटर एअर पिस्‍तुल प्रकारात 194.1 गुण मिळवून सुवर्णवेध घेतला आहे.एवढया गुणांनी सुवर्ण पदक आपल्‍या नावे करणारा तो एकमेव नेमबाज ठरला आहे. उपांत्‍यपूर्व फेरीमध्‍येही त्‍याने 562 गुण मिळवून किर्तीमान स्‍थापन केला होता.
श्रेयसीने 'रौप्‍य' पदकावर कोरले नाव
श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रॅप नेमबाजीत शानदार कामगिरी करताना रौप्यपदक जिंकले. यानतंर पुरुषांच्या डबल ट्रॅप प्रकारात भारताच्या मोहंमद असदने कांस्यपदक जिंकून दमदार प्रदर्शन केले. ग्लासगो गेम्समध्ये भारताचे हे 18 आणि 19 वे पदक ठरले. यातील तब्बल नऊ पदके नेमबाजीतून आली आहेत. भारताने आतापर्यंत नेमबाजीत सर्वाधिक तीन सुवर्ण, पाच रौप्यपदक आणि एक कांस्य जिंकली आहेत.
महिलांच्या डबल ट्रॅपचे सुवर्ण आणि कांस्यपदक इंग्लंडच्या नेमबाजांनी जिंकले. चालरेट केरवूडने 94 आणि रेचल पारिशने 91 गुणांसह कांस्यपदक मिळवले. तिने बॅरी बडन शूटिंग रेंजवर पहिल्या सिरीजमध्ये 22 आणि दुसर्‍यामध्ये 24 तर तिसर्‍या व चौथ्या सिरीजमध्ये प्रत्येकी 23 गुण मिळवले. केरवूडने आपली सुरुवात 26 गुणांपासून केली. नंतर पुढच्या सिरीजमध्ये तिने 25, 24, 19 असे गुण मिळवले. भारताची भारताची वर्षा वर्मन 88 गुणांसह पाचव्या स्थानी राहिली. तिने 22, 19, 24 आणि 23 गुण मिळवले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, जीतू रॉयचे छायाचित्रे...