(रॉच्या एका सामन्यात केनला खांदावर उचलून आपटताना जॉन सीना)
न्युयॉर्क - डब्ल्यूडब्ल्यूई (वर्ल्ड रेसलिंग इंटरटेनमेंट) स्पर्धेतील एका सामन्यात सुप्रसिध्द पहिलवान अंडरटेकरचा भाऊ केन याला पराभव पत्करावा लागला. जॉन सीनासोबत झालेल्या या सामन्यात केनला धुळ चारत जॉन सीना 'मनी इन द बँक' स्पर्धेसाठी पात्र ठरला. 29 जूनला होणार्या या स्पर्धेत सीनाची टक्कर रॉमन रैगंस सोबत असणार आहे. तर दुसरीकडे सुरू असलेल्या एका सामन्यामध्ये आपल्या खतरनाक स्मॅकसाठी प्रसिध्द असलेल्या रॉमन रँग्सने डीन एम्ब्रॉन्सचा पराभव केला.
धमाकेदार झाला सामना, केनला धोबीपछाड
मोठमोठ्या पहिलवानांना क्षणात धुळ चारायला लावणाऱ्या केनने या सामन्याच एक चांगली सुरूवात केली. आपल्या अक्रामक फायटींग अंदाजासाठी प्रसिध्द असलेला जॉन सीना केन पुढे हतबल दिसत होता. केनने मंचावर येताच सीनावर बुक्क्यांचा वर्षाव केला. रिंगच्या कोपर्यात सीनाला घेऊन जाऊन केनने आपल्या नेहमीच्या अंदाजात त्याची धुलाई केली. कसे तरी सीनाने स्वतःला वाचवले. या दरम्यान केनने एक मोठी चुक केली. सीनाला मारहाण केल्यानंतर केन जल्लोषात मग्न झाला. हीच संधी साधत सीनाने केनवर धाव घेतली. एका पाठोपाठ एक अशा जोरदार बुक्क्यांनी केनची हालतच बिघडवून टाकली.
पुढील सामन्यासाठी सीना पात्र, आता पुढील सामना रॉमनसोबत
जॉन सीनाने दुसर्या फेरीत परतत केनने विजयाआधीच जल्लोष करण्याची चुक मात्र केली नाही. त्याने केनला बॅक पंच मारून रिंगमधून बाहेर फेकले. त्यानंतर एक धमाकेदार स्मॅक देऊन केनला पराभव स्वीकारायला लावले. या विजयानंतर सीनाला 'मनी इन द बॅंक'साठी पात्र ठरवण्यात आले. तर दुसर्या सामन्यात रॉमन रँग्स याने डीन एम्बॉसला हरवले. रॅंग्स आणि सीना यांच्यात पुढील सामना 29 जूनला होणार आहे.
जॉन सीनाने पटकावले आहेत 14 पुरस्कार
डब्ल्यूडब्ल्यूईचे चॅम्पियन राहिलेल्या डॅनिअल ब्रायन यांच्यासोबत फाईट करणार्या जॉन सीनाने आतापर्यंतच्या प्रोफेशनल करिअरमध्ये 14 पुरस्कार जिंकले आहेत. जर तो यावेळी 'मनी इन द बँक' हा पुरस्कार मिळवतो तर हा त्याच्या आयुष्यातील हा 15 वा पुरस्कार असेल.
पुढील स्लाईडमध्ये पहा, या सामन्याची काही रोमांचक छायाचित्रे....