आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wrestler John Cena Outduels Nikki Bella In Beer Pong

रेसलर जॉन सीनाच्या तोंडावर गर्लफ्रेंडने फेकली बिअर, बघा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी- रेसलर जॉन सीनाच्या घरी पार्टीसारखे वातावरण होते. निक्की बेला आणि जॉन सीना यांच्या व्यतिरिक्त एक कॉमन फ्रेंड उपस्थित होता. यावेळी दिवा चॅम्पिअन निक्की बेलाने बॉयफ्रेंड जॉन सीनाच्या तोंडावर बिअर फेकली. यामुळे दोघांचा मित्र अवाक् झाला.
जाणून घ्या बिअर फेकण्याचे कारण
निक्की आणि जॉन सीना एक खेळ खेळत होते. गेमच्या नियमांनुसार, दोघांसमोर असलेल्या टेबलांवर प्रत्येकी 10 ग्लास बिअर ठेवण्यात आली होती. दोघेही एकानंतर एक बिअरच्या ग्लासमध्ये प्लॅस्टिकचे बॉल फेकत होते. बॉल पडलेल्या ग्लासमधील बिअर दोघांपैकी एकाला प्यावी लागत होती. सुरवातील निक्कीने आघाडी केली होती. पण जॉनने त्यानंतर तिला पछाडले. जॉन एकानंतर एक बरोबर निशाणा साधत होता. शेवटी निक्की पराजीत झाली. यामुळे तिला फार राग आला. तिने शेवटच्या ग्लासमधील बिअर पिण्याऐवजी जॉनच्या तोंडावर भिरकावली.
दोघांमध्ये आहे निखळ प्रेम
जॉन सीना आणि निक्की बेला यांचे प्रेमप्रकरण पुन्हा एकदा बहरले आहे. दोघांनी काही दिवसांपूर्वी आऊटींग केल्याचे वृत्त आहे. बऱ्याच दिवसांनी दोघे पब्लिक प्लेसवर एकत्र दिसले. निक्की कधी आई होणार नाही, अशी अट समोर करुन जॉन सीनाने लग्नाला होकार दिला होता. त्यानंतर दोघांमध्ये तणाव झाल्याचे वृत्तही होते. पण आता ऑल इज वेल असल्याचे दिसून येते.
पुढील स्लाईडवर बघा, निक्की बेलाने अशी फेकली जॉन सीनाच्या तोंडावर बिअर... बघा दोघांचे रोमॅंटिक फोटो...