आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशेल जॉन्सन विश्वचषकाबाहेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन दुखापतीमुळे आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघात डाऊग बॉलिंगरची वर्णी लागली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान जॉन्सनच्या टाचेला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला होता. ‘जॉन्सनची दुखापत लवकर दुरुस्त व्हावी म्हणून आम्ही बरेच प्रयत्न केले. पण दुर्दैवाने हवा तितका प्रतिसाद मिळत नाही. पायाची सूज कमी व्हावी यासाठी अजूनही प्रयत्नात आहोत, असे ऑस्ट्रेलियन संघाचे वैद्यकीय अधिकारी जस्टिन पावोलिनी यांनी म्हटले आहे.’ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौर्‍यात खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत जॉन्सन खेळला नव्हता. तरीसुद्धा ऑस्ट्रेलियाने ही मालिका 2-0 ने जिंकली होती. आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघात जॉन्सनच्या जागी डाऊग बॉलिंगरची वर्णी लागली आहे. बॉलिंगर हा वेगवान गोलंदाज असून ऑक्टोबर 2011 नंतर प्रथमच त्याची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात निवड झाली आहे.