आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Join In Revenu Service For Avoiding Depress Virdhaval Khade

नैराश्य टाळण्यासाठी महसूल सेवेत - वीरधवल खाडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - खेळाडूंना आगाऊ निधी मिळण्याचा अभाव, नंतर मिळणा-या निधीतही काटकसर, वादविवाद, खेळांतर्गत संघटना स्तरांवर चालणारे राजकारण आणि त्यातून येणारे नैराश्य टाळण्यासाठीच मी शासकीय नोकरीचा पर्याय निवडला. गत बारा वर्षांहून अधिक काळापासून तेच अर्ज करा, प्रस्ताव पाठवा , फेरमागणी करा असला ससेमिरा नको, म्हणून मी क्रीडा विभागाचा अधिकारी बनण्यापेक्षा महसूल विभागात तहसीलदार म्हणून रुजू झाल्याचे सांगताना आंतरराष्‍ट्री य जलतरणपटू वीरधवल खाडे याने क्रीडा क्षेत्रातील बजबजपुरी आणि त्यामुळे खेळाडूंना येणा-या नैराश्यावर कडवट शब्दात मनातील भावना व्यक्त केल्या.

जलतरणपटू म्हणून मी जितके कष्ट घेतले, त्या तुलनेत मला मिळालेले यश समाधानकारक आहे. मात्र, त्याचा अर्थ मला वादविवाद बघावेच लागले नाहीत किंवा राजकारणाचा फटका बसलाच नाही, असे नाही. ऑ लिम्पिक पात्र ठरल्यानंतरही जायला न मिळाल्याने मला नैराश्य आले होते. शासनाकडून मला नोकरीसंदर्भात विचारणा झाल्यावर रडून कुढून काहीच होणार नाही, हे लक्षात आल्याने नैराश्य टाळण्याच्या उद्देशानेच हा प्रस्ताव स्वीकारल्याचे वीरधवलने नमूद केले.

तहसीलदार हे पद माझ्यासाठी नवीन
क्रीडा क्षेत्रातील खूप वाद मी अनुभवले होते. त्यामुळे पुन्हा तिथे जाण्याची इच्छा नव्हती. तर पोलिस अधिकारी म्हणजे नोकरीला वेळकाळ नसल्याने तो पर्यायदेखील नाकारला. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला महसूल सेवेत जाण्याचा पर्याय सांगितला. मला खरे तर तहसीलदार पद असते, हेदेखील माहिती नव्हते. मात्र आता या पदासाठीचे प्रशिक्षण घेताना मला या कामात खूप रस वाटत असल्याचे तो म्हणाला.

...माझीच चूक
2008 साली वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये अवघ्या शतांश सेकंदाने सुवर्णपदक हुकले. मात्र, त्याचा नशिबाशी काही संबंध नाही. त्या वेळी नव्या कॉस्च्युमने खेळण्याची चूक माझीच होती.

खेळतानाच पैसा मिळायला हवा ...
भारतात केवळ क्रिकेट, बॉक्सिंग, शूटिंग, कुस्ती, बॅडमिंटन आणि टेनीस या खेळांना आणि त्यातील खेळाडूंना पैसा मिळतो. तर अन्य क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंना पैशासाठी नोक-या करण्याची वेळ येते. आपल्याकडे खेळतानाच जर खेळाडूंना चांगला पैसा मिळाला तर त्याचे करिअर त्याला अधिक चांगल्या प्रकारे जोपासता येणे शक्य असते. असे झाले तर खेळ आणि खेळाडू या दोघांचा फायदा होत असल्याचे वीरधवल म्हणाला.