आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jokes On Yuvraj Singh Trending On Social Sites Latest News In Marathi

Social Mediaमध्‍ये युवराज बनलाय व्हिलन, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्टस ब्युरो - 2007 च्या टी-20 विश्‍वचषक स्पर्धेत इंग्लंडविरूध्‍द खेळताना युवराज सिंगने लागोपाठ सहा षटकार लगावून सगळ्या क्रीडा रसिकांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. मात्र तोच युवराज 2014 मधील टी-20 विश्‍वचषकात खलनायक बनला. युवराज आणि भारतीय संघाची सोशल मीडियात टर उडवली जात आहे. टी-20 विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने 20 षटकात 130 अशी सामान्य धावसंख्‍या उभारली होती. यास प्रत्युत्तर देताना श्रीलंकेने सहज भारतावर विजय मिळवून टी-20 विश्‍वचषकाचा बादशाह बनला. सामन्यात युवराजने 21 चेंडूत 11 धावा केल्या. ते पुरेसे नव्हते कारण भारताला मोठी धावसंख्‍या बनवण्‍याची खूप गरज होती. पण युवराज ती गरज पूर्ण न करता केवळ संथपध्‍दतीने फलंदाजी करत होता. तो बाद होई पर्यंत भारताच्या हातातून वेळ निघून गेली होती. इतर खेळाडूंना भक्कम धाव उभारण्‍यास पुरेसा वेळ मिळाला नाही.


विजय मल्ल्याही सुटले नाही
युवराज सिंग याच्याबरोबर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे मालक विजय मल्ल्या यांची टर उडवण्‍यात आली. वापरकर्ते वेगवेगळे छायाचित्रे शेअर करून आपल्या प्रतिक्रिया देत होते. योगायोग असा की आयपीएलच्या 7 व्या पर्वासाठी विजय मल्ल्याच्या संघाने 14 कोटीला युवराज सिंगला खरेदी केले आहे.


पुढे क्लिक करा आणि पाहा कशा पध्‍दतीने सोशल साइट्सवर युवराज आणि व‍िजय मल्ल्या यांची टर उडवली....