आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाेनाथनने केली क्रिकेट निवृत्तीची घाेषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज म्हणून गणल्या जाणा-या जाेनाथन ट्राॅटने त्याच्या निवृत्तीची घाेषणा केली अाहे. विंडीजविरुद्धच्या कसाेटी मालिकेत सहा डावांपैकी तीन डावांमध्ये शून्यावर बाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर जाेनाथन ट्राॅटने हा निर्णय घेतला असण्याची चिन्हे अाहेत.

विंडीजविरुद्धच्या मालिकेत इंग्लंडला १ - १ अशा बराेबरीत समाधान मानावे लागले. त्यातही ट्राॅटने सहा डावांमध्ये मिळून अवघ्या ७२ धावांचे याेगदान दिले हाेते. त्यामुळे ट्राॅटच्या कामगिरीवर टीकादेखील झाली हाेती. त्या पार्श्वभूमीवर बाेलताना ट्राॅटने हा निर्णय घेणे माझ्यासाठी खूप क्लेशकारक हाेते. मात्र ज्या स्तरावरचा खेळ इंग्लंड संघाला अपेक्षित अाहे, त्या स्तरावरचा खेळ हाेत नसल्यानेच मी हा निर्णय घेतल्याचे त्याने नमूद केले.

अाकड्यात
५२ कसाेटी सामने खेळला ट्राॅट
४४ धावांच्या सरासरीसह कसाेटीत ३८३५ धावा
६८ एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व

वाॅर्विकशायरकडून खेळणार
निवृत्तीनंतर वाॅर्विकशायर या काउंटी क्लबकडून खेळणे सुरूच ठेवणार असल्याचे ट्राॅटने म्हटले अाहे. तर इंग्लंडचा कप्तान अॅलिस्टर कुकने ट्राॅटबराेबर खेळण्याचा मान मिळाल्याचा अानंद असून त्याला सलाम करीत असल्याचे नमूद केले. त्याच्यासमवेत खेळताना अाम्ही काही माेठे विजय मिळवले, असेही त्याने या वेळी सांगितले.

लाैकिकाला साजेसा खेळलाे नाही
निवृत्तीनंतर पुन्हा इंग्लंडकडून खेळण्याची विनंती करण्यात अाली, हा माझा गाैरव हाेता. मात्र, त्याला अनुरूप मी माझा खेळ दाखवू शकलाे नाही. माझे माघारी परतणे संघाला फलदायक ठरले नसल्याने मी निराश झालाे अाहे. त्यामुळे निवृत्ती जाहीर करताना मी माझ्या चाहत्यांचे अाभार मानू इच्छिताे. इंग्लंडच्या संघातून खेळताना पाठिंबा देणा-या माझ्या सर्व चाहत्यांचा मी कायम ऋणी राहीन, असेही ट्राॅटने म्हटले.