आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेंक विजयी; पुण्याची बंगावर मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ज्युलियन शेंक, अनुप श्रीधर, सौरभ वर्माने शुक्रवारी यजमान पुणे पिस्टन्सला इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये एकतर्फी विजय मिळवून दिला. या संघाने घरच्या मैदानावर बंगा बीट्सला 4-1 ने पराभूत केले.

जर्मनीच्या ज्युलियन शेंकने महिला एकेरीत बंगा बीट्सच्या कॅरोलीन मेरिनला 21-20, 21-10 ने पराभूत केले. या विजयाने पुणे पिस्टन्सने 1-0 ने आघाडी मिळवली होती.

श्रीधरचा धक्कादायक विजय
पुण्याच्या श्रीधर अनुपने धक्कादायक विजय मिळवला. त्याने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेला व बंगा बीट्सकडून खेळत असलेल्या हू युनला 21-12, 21-18 ने धूळ चारली.

निल्सन-तान व्हीचा निर्णायक विजय
निल्सन-तान व्हीने बंगा बीट्सच्या मोगेनसेन-अक्षय दनावलकरला 21-18, 21-18 ने हरवून पुणे पिस्टन्सला 3-0 ने निर्णायक विजय मिळवून दिला. पुणेच्या सौरभ वर्माने पी. कश्यपला 19-21, 21-18, 11-4 ने हरवले. बंगा बीटसकडून मेरिना-मोगेनसेनने मिश्र दुहेरीत पोनप्पा-निल्सनला 20-21, 21-14, 11-8 ने पराभूत केले. यासह बंगा बीट्स संघाने लढतीत एक विजय मिळवला.