आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मम्मी आयशासोबत पप्पाला चीअर करताना दिसला \'ज्यूनिअर शिखर\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: शिखर धवनची पत्नी आयशा आणि मुलगा)
मोहाली- ज्यूनिअर शिखर धवन, अर्थात जोरावर हा आपल्या मम्मी आयशासोबत पप्पाला चीअर करताना मोहाली स्टेडियमवर दिसला. चिमुकल्या जोरावरला भलेही क्रिकेटमधील 'क' समजत नसेल, परंतु तो आयशाच्या खूशीत धमाल मस्ती करत होता. हात वर करून जणू तो शिखरला चीअर करत होता.

शिखर धवनचा सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेवनचा 20 धावांनी धुव्वा उडवला. परंतु, शिखर धवनला आपल्या संघासाठी काहीही करता आले नाही. केवळ एक धाव करून तो आऊट झाला.

प्रीती-नेस वाडियाही पोहोचले
बॉलीवूड स्टार आणि किंग्ज इलेवन पंजाबची को-ऑनर प्रीती झिंटा आपल्या संघाला चीअर करण्यासाठी स्टेडिअमवर पोहोचली होती. प्रीती आपल्या नेहमीच्या अंदाजात आपल्या संघाला चीअर करताना दिसली. दुसरीकडे, नेस वाडिया हा देखील ग्राउंड स्टाफशी बोलताना दिसला. नेस वाडिया आणि प्रीतीमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु आहे.
लढत रोमांचक लढतीत...
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध किंग्स इलेवन पंजाबमध्ये सोमवारी झालेली लढत रोमांचक ठरली. हैदराबादने पंजावला आपल्या घरच्या मैदानावर 20 धावांनी धूळ चारली. हैदराबादने पंजाबसमोर विजयासाठी 151 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, हैदराबादच्या भेदक गोलंदाजांसमोर पंजाब 9 बाद, 130 धावांवर गार पडला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, शिखर धवनची पत्नी आयशा, मुलगा जोरावर आणि प्रीटी झिंटाचे फोटो...