आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Justice Gatline Best Runner In Rome Golden Diamond League

अमेरिकेचा तुफानी गॅटलिन ठरला वेगवान धावपटू; युसेन बोल्ट दुसर्‍या स्थानी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोम- लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता जस्टिन गॅटलिन रोम गोल्डन डायमंड लीगमध्ये सर्वात वेगवान धावपटू ठरला. त्याने 100 मीटरची शर्यत 9.94 सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने 0.01 सेकंदाच्या आघाडीने जगातील सर्वात वेगवान धावपटू बोल्टला मागे टाकले. या वेळी 9.95 सेकंदांत शर्यत पूर्ण करणार्‍या बोल्टला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. फ्रान्सचा जिमी विसूट (10.2 से.) तिसर्‍या स्थानी राहिला. तब्बल चार वर्षांनंतर दमदार पुनरागमन करताना अमेरिकेच्या गॅटलिनने अव्वल स्थान गाठले.

पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेच्या लाश्वान मेरिटने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने 44.96 सेकंदांत शर्यत जिंकली. सौदी अरेबियाचा युसूफ अहमद (45.24 से.) दुसर्‍या स्थानावर राहिला. अमेरिकेच्या जोशुआला (45.26 से.) तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
रशियाच्या सर्जिया सुबेकोव्हने पुरुष गटातील 110 मीटर अडथळ्याची शर्यत जिंकली. त्याने 13.20 सेकंदांत निश्चित अंतर पूर्ण करून सुवर्णपदक आपल्या नावे केले. या गटात फ्रान्सचा पास्कल (13.31 से.) दुसर्‍या आणि हंगेरीचा बालाझ बाजी (13.44 से.) तिसर्‍या स्थानी राहिला.

डॉन हार्पर-नेल्सन अव्वलस्थानी
महिलांच्या 100 मीटर अडथळ्याच्या शर्यतीत अमेरिकेची डॉन हार्पर नेल्सन अव्वलस्थानी राहिली. तिने आपली सहकारी लोलो जोन्सनला पिछाडीवर टाकून शर्यत 12.65 सेकंदात जिंकली. जोन्सनने 12.70 सेकंदांसह दुसरे स्थान गाठले.

मुरिल्ले अहोउर चॅम्पियन
महिलांच्या 200 मी. शर्यतीत मुरिल्ले अहोउर( 22.36 से.) चॅम्पियन ठरली. तिने आॅलिम्पिक चॅम्पियन अ‍ॅलिसन फेलिक्सला मागे टाकले.