आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडा अाेपन बॅडमिंटन : ज्वाला-अश्विनी फायनलमध्ये, ३० मिनिटांत विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलागरी - राष्ट्रकुल स्पर्धेतील राैप्यपदक विजेत्या ज्वाला गुट्टा अाणि अश्विनी पाेनप्पाला कॅनडा अाेपन ग्रँडप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीचा किताब जिंकण्याची संधी अाहे. या तिसऱ्या मानांकित जाेडीने अंतिम फेरीत धडक मारली. ज्वाला अाणि अश्विनीने अवघ्या ३० मिनिटांमध्ये महिला दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये विजय मिळवला. या जाेडीने जपानच्या शिहाे तानका अाणि काेहारू याेनमाेताेवर २१-१७, २१-१६ ने विजय मिळवला.

दमदार सुरुवात करताना तिसऱ्या मानांकित जाेडीने पहिल्या गेममध्ये सहज बाजी मारली. यासह त्यांनी लढतीत अाघाडी मिळवली. दरम्यान, जपानच्या जाेडीने पहिल्या गेममध्ये विजयासाठी जाेरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांना समाधानकारक यश मिळाले नाही.

खडतर अाव्हान
भारताच्या ज्वाला अाणि अश्विनीला फायनलमध्ये अव्वल मानांकित एफिई मुस्काेनेस अाणि सेलेना पिईकचे तगडे अाव्हान असेल. हाॅलंडच्या जाेडीने उपांत्य सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्यांनी हाॅगकाँगच्या पुन लाेक यान व यिंगवर २१-१६, १८-२१, २१-१६ ने मात केली.
बातम्या आणखी आहेत...