आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jwala Gutta Angry Over Reduction In Base Price At Last Moment

बेस प्राईस घटवल्‍यावरुन 'ज्वाला' भडकली, रॅकेटनेच उत्तर देण्‍याचा निधार्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये अगदी अखेरच्या क्षणी बेस प्राइस घटविण्यात आल्याबाबत बोलताना माजी ऑलिम्पिकपटू व दुहेरीतील भारताची टॉपची खेळाडू ज्वाला गुट्टा हिने त्या स्पर्धेत आता माझी रॅकेटच बोलेल, असा सूचक इशाराच दिला आहे.

त्या संपूर्ण प्रकरणात संबंधितांनी आम्हाला किमान पूर्वकल्पना द्यावी, इतकीच आमची अपेक्षा होती. इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये खेळायला मी उत्सुक असून त्या स्पर्धेत सहभागाचा आनंदच असल्याचे ज्वाला गुट्टा हिने सांगितले. बॅडमिंटन कोर्ट हे माझे क्षेत्र असून तिथेच आता माझी रॅकेट बोलणार असल्याचेही तिने नमूद केले.
ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या दोघींची बेसप्राईस 50 हजार डॉलरवरून थेट 25 हजार डॉलर करण्यात आली होती. त्यामुळे ज्वालाला केवळ साडेअठरा लाख तर अश्विनीला केवळ पंधरा लाख रुपयांचीच बोली लागली. अशा प्रकारे बेसप्राइस घटविण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. मी त्या संदर्भात बोलले तर लोक म्हणतील की ती बंडखोर असल्याची किंवा तक्रारखोर असल्याचा आरोप होइल, असेही ज्वाला गुट्टा हिने नमूद केले.