आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jwala Gutta Can Participate In All Tournaments: High Court Tells BAI

ज्वाला पुन्हा भडकली; बीएआयवर टीका, बंदीचा प्रस्ताव मूर्खपणाचा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - बॅडमिंटन संघटनेशी उघड पंगा घेणार्‍या ज्वाला गुट्टाने शनिवारी आपल्या बोलण्याचे, कृतीचे जोरदार समर्थन केले. आपले बोलणे कोणाच्याही विरोधात नाही. ते निगेटिव्हली घेण्यात आले असून आपल्यावर आजीवन बंदी घालण्याचा प्रस्ताव हा निव्वळ मूर्खपणा आहे, असे खडे बोल तिने पुन्हा एकवार भारतीय बॅडमिंटन संघटनेला सुनावले आहेत.
बॅडमिंटन शिस्तपालन समितीने ज्वालावर आजीवन बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. याविरुद्ध ज्वालाने दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

काय म्हणाली ज्वाला?
बोलण्यात चुकीचे काय आहे? उघड बोलण्यावर आजीवन बंदी घालणार? हे खरेच मूर्खपणाचे आहे! मी असे बोलले तरी काय? बरं, मी खोटेही बोलले नाही. मी शब्दांचीही सरमिसळ केली नाही.

बॅडमिंटन हा माझा प्रिय खेळ आहे. मला सर्वाेत्तम उंची गाठायची आहे. दिवसांतले आठ तास बॅडमिंटन खेळते. मला बॅडमिंटनच खेळता येते, राजकारण नाही