आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वाला गुट्टाने घेतली न्यायालयात धाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - प्रख्यात बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने भारतीय बॅडमिंटन संघटनेविरुद्ध (बीपीई) दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बीपीईच्या शिस्तपालन समितीने ज्वालावर भारतीय बॅडमिंटन लीगमध्ये आचारसंहीता भंग केल्याचा आरोप करीत आजीवन बंदीची शिफारस केली आहे. दरम्यान, ज्वालाने संपर्क साधल्यास तिच्या बॅडमिंटन बंदीबाबतच्या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्रसिंह यांनी दिल्याने तिला या प्रकरणात काही दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.


आम्ही कायदेशिर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, यानुसार आम्ही बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असे ज्वालाचे वडिल कांती गुट्टा यांनी सांगितले. अध्यक्ष अखिलेश गुप्ता यांनी गठीत केलेल्या तीन सदस्यीय समितीचा निर्णय अद्याप यायचा असल्याने बीपीईने पुढचा एक महिन कोणत्याही आंतरराष्‍ट्रीय स्पर्धेसाठी निवडीदरम्यान ज्वालाच्या नावावर विचार करण्या नकार दिला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती ज्वाला गुट्टा डेन्मार्क आणि फे्रंच ओपनमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. दुसरीकडे बंदी नको असल्यास ज्वालाने कोणत्याही अटी-शर्तीविना क्षमा मागावी, असे बॅडमिंटन असोसिएशनचे म्हणणे आहे.