आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kabaddi, Kho Kho Sports Scheme Issue , Ex Mp Husen Dalwai

कबड्डी, खो-खोसाठी योजना राबवा : दलवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कबड्डी, खो-खो या देशी महाराष्ट्रीय खेळांचा विदेशात नियमित प्रचार व्हावा आणि मराठवाडा, कोकण, विदर्भ, खान्देशातील मागासलेपण दूर करावे. विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात तीन गोष्टींचा मुख्य उल्लेख करण्यात आला आहे. यात कबड्डी, खो-खो या खेळांच्या पुरुषांचे दोन दोन संघ समाविष्ट करणारी पथके, पंधरवडाभर विदेश दौऱ्यावर पाठवावीत. मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आदी देशांत संघाचे प्रदर्शनीय सामने खेळवावे. संघातील खेळाडूंची देशात एक महिना निवास, भोजन, क्रीडांगण, प्रसिद्धी आदींच्या व्यवस्थेसाठी २ सदस्यांचे पथक आणि वार्षिक दोन कोटी रुपये तरतूद असावी. महाराष्ट्रातील क्रीडा विकासासाठी प्रशिक्षक नेमणे, स्थानिक स्पर्धा भरवणे. जिम्नॅस्टिक व इतर पायाभूत सुविधांसह खेळासाठी इनडोअर केंद्र बांधणे आणि नियोजनासाठी ३० कोटींची तरतूद करावी. सध्या असलेल्या सर्व मैदानांची वर्गवारी करून ते दुरुस्त करावे. तसेच चार वर्षांपासून रखडलेल्या कामाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी दलवाई यांनी केली.