आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kabaddi League Grand Opening, Sachin Amitabh Bachchan Reached

‘प्रो-कबड्डी’चे ग्लॅमरस उद्घाटन; यजमान मुंबईची जयपूरवर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय सिनेसृष्टीचा पाठिंबा लाभलेल्या ‘प्रो-कबड्डी’चे आज मुंबईत फिल्मी स्टाइलमध्ये उद्घाटन झाले. रॉनी स्क्रूवालाच्या ‘यू मुम्बा’ या यजमान संघाने अभिषेक बच्चनच्या मालकीच्या जयपूर पिंक पँथर्स संघाचा 45-30 असा पराभव केला.

स्टार स्पोर्ट्सचा पुरस्कार लाभलेल्या ‘प्रो-कबड्डी’ला आज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरपासून अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, अभिषेक बच्चन, जया बच्चन, ऐश्वर्या बच्चन, टीना अंबानी, सुनील शेट्टी यांच्या उपस्थितीने ग्लॅमर आणण्याचा प्रयत्न झाला.

30 सेकंद वेळेची र्मयादा आणि तिसर्‍या चढाईतील अत्यावश्यक झटापट या नव्या नियमांमुळे प्रारंभी गोंधळलेले खेळाडू नंतर मात्र स्थिरावले. 7-5 अशी पूर्वार्धाच्या सुरुवातीतील आघाडी घेणार्‍या जयपूर संघाला त्यानंतर मुंबईला रोखणे शक्य झाले नाही.

गॅलरीत रिकाम्या खुर्च्या...
सचिन, अमिताभ व अन्य सितारे काही वेळा गोंधळलेल्या अवस्थेत सामना पाहत होते. मात्र, कबड्डी या खेळाचा प्रेक्षक वर्ग कुठेच दिसत नव्हता. गॅलरीमध्ये बर्‍याच खुच्र्या रिकाम्या होत्या. त्यामुळे प्रो-कबड्डीचे झोकात उद्घाटन झाले. कबड्डीला ग्लॅमर प्राप्त झाले, वातानुकूलित स्टेडियममधील कबड्डीला कामगार वर्गातील कष्टकरी लोकांमधील खेळाचा ना गंध होता, ना आवेश होता.