आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबड्डीत भारतीय संघाचे वर्चस्व कायम ठेवणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दक्षिण कोरियातील १७ व्या आशियाई स्पर्धेत सातव्या सुवर्णपदकावर नाव कोरून कबड्डीमधील भारताचे निर्विवाद वर्चस्व कायम ठेवणार असल्याचा निर्धार अर्जुन पुरस्कार विजेता कबड्डीपटू नवनीत गौतमने केला. गत रविवारी भारताचा पुरुष कबड्डी संघ स्पर्धेसाठी
इंचियोन येथे रवाना होणार आहे. या स्पर्धेत संघाकडून उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे जयपूरच्या गौतमने दैनिक ‘दिव्य मराठी’शी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.

जयपूर येथील ३० वर्षीय नवनीत गौतम आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मागील सहा स्पर्धांपासून तो भारतीय संघाचा सदस्य आहे. स्टार डिफेंडर असलेल्या नवनीतची संघातील खेळी उल्लेखनीय आहे. त्यामुळे त्याला २००७ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रो-कबड्डीने ग्लॅमर मिळाले
नुकत्याच झालेल्या प्रो- लीगमुळे कबड्डीला ग्लॅमर मिळाले आहे. या लीगमुळे सहभागी झालेल्या खेळाडूंना एक वेगळी ओळखही मिळाली आहे. त्यामुळे देशभरातील लाखो चाहते आता नावानिशी कबड्डीपटूंना ओळखतात. या व्यासपीठावर आपल्यातील कौशल्य दाखवून चमकण्याची मोठी संधी युवा खेळाडूंना आहे. त्यासाठी मेहनतीची मोठी गरज आहे, असेही नवनीत म्हणाला.

भारताचे १९९० पासून वर्चस्व
गत १९९० पासून भारतीय कबड्डी संघ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरत आहे. आतापर्यंत या संघाने गोल्डन षटकार मारला आहे. स्पर्धेतील कबड्डीच्या सामन्यांना २८ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. या वेळी बांगलादेशविरुद्ध लढतीतून भारतीय संघाला आपल्या विजयी मोहिमेचा शुभारंभ करण्याची संधी आहे.
0१ ला प्रो- कबड्डी लीगचा किताब नवनीतने आपल्या नेतृत्वाखाली अभिषेकच्या जयपूर पिंक पॅथर्स संघाला मिळवून दिला.

भारताचे सामने
दिनांक विरुध्‍द संघ
२८ सप्टेंबर बांगलादेश
२९ सप्टेंबर थायलंड
३० सप्टेंबर पाकिस्तान