आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kane Williamson Banned From Bowling By ICC, News In Marathi

केन विल्यम्सनच्या गोलंदाजीवर बंदी; गोलंदाजीची अ‍ॅक्शन अवैध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- न्यूझीलंडच्या ऑफस्पिनर केन विल्यम्सनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील गोलंदाजीवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीने बुधवारी हा कारवाईचा बडगा उगारला. नुकत्याच एका समितीने केलेल्या सखोल चौकशीत विल्यम्सनच्या गोलंदाजीची कृतीची अवैध असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.

कार्डिफ मेट्रोपोलिटन विद्यापीठामध्ये नऊ जुलैला करण्यात आलेल्या विश्लेषणादरम्यान, न्यूझीलंडच्या खेळाडूने अधिकाधिक चेंडू अवैध कृतीतून टाकले आहेत. त्यामुळेच त्याला बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. तसेच अशा प्रकारे अवैध गोलंदाजीच्या कृतीमुळे बंदीची कारवाई करण्यात आलेला तो पहिला न्यूझीलंडचा गोलंदाज ठरला.

यांच्यावरही झाली होती कारवाई
आयसीसीने गोलंदाजीच्या अवैध कृतीमुळे भारताचा हरभजन, इंग्लंडचा जेम्स कर्टले, विंडीज जमर्रन लॉसन, शेन शिलिंगफोर्ड, पाकच्या शोएब अख्तरवरही कारवाई केली आहे.