आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kapil Dev Awarded Life Achievement In House Of Lords In England, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कपिलदेवला जीवनगौरव, इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये रंगला गौरव सोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिलदेवला इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. भारत आणि युरोपियन बिझनेस फोरमच्या (आयबीइएफ) वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कपिलदेवचा हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने १९८३ चा विश्वचषक पटकावला होता.

‘मला भारतीय होण्याचा सार्थ अभिमान आहे. जगातील कोणत्याही देशांशी व्यापाराच्या दृष्टीने व्यवहार करण्याची क्षमता भारतामध्ये आहे. भारतावर केलेल्या राज्यामुळे मी इंग्लंडचा फार द्वेष करत होतो. मात्र, आज मी त्यांच्यावर फार खुश आहे. या देशाने आम्हाला क्रिकेट दिले,’ असेही कपिलदेव म्हणाला.