Home | Sports | Other Sports | kapil-dev-bcci-clashes

बोर्डात शिरकाव करण्यात रस नाही-कपिलदेव

divya marathi team | Update - Jun 02, 2011, 06:02 AM IST

क्रिकेट बोर्डाने निमंत्रण दिले हा त्यांचा चांगुलपणा. येथे येण्याचे एकमेव आकर्षण होते ते म्हणजे या सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करायचे. कौतुक करायचे. त्यांना प्रत्यक्ष भेटायचे. माझा हेतू साध्य झाला आहे.

  • kapil-dev-bcci-clashes

    मुंबई - 31 जानेवारी हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे. इंडियन क्रिकेट लीग (आयपीएल) या बंडखोर क्रिकेट लीगचा सेनानी कपिलदेव आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचे सर्व पदाधिकारी या दिवशी एकत्रितपणे व्यासपीठावर होते. भारतीय क्रिकेट बोर्डाने सत्कार सोहळ्यासाठी 1983 च्या विजेत्या भारतीय संघाला आणि त्यांचा कप्तान कपिलदेवला आमंत्रित केलं होतं. कपिलदेवने दिलखुलासपणे या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि तो मुंबईत झालेल्या या सोहळ्याला उपस्थितही राहिला होता.

    ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीशी यासंदर्भात बातचीत करताना कपिलदेव म्हणाला, ‘‘कसलं वैर आणि काय? ही मुलं सध्या एवढं चांगलं क्रिकेट खेळत आहेत की त्यांचे कौतुक करायला मी कुठूनही आलो असतो. क्रिकेट बोर्डाने निमंत्रण दिले हा त्यांचा चांगुलपणा. येथे येण्याचे एकमेव आकर्षण होते ते म्हणजे या सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करायचे. कौतुक करायचे. त्यांना प्रत्यक्ष भेटायचे. माझा हेतू साध्य झाला आहे.’’

    क्रिकेट बोर्डाशी असलेले वैर तर मिटले आहे. यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाच्या राजकारभारात रस घेणार का? या प्रश्नावर कपिलदेव हसला आणि म्हणाला, ‘‘मुळीच नाही! मला भारतीय क्रिकेट बोर्डावर येण्यात जराही रस नाही. ’’

Trending