आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Dev News In Marathi, Hockey India, Narendra Batra , Divya Marathi

कपलि-बत्रांत कलगीतुरा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अर्जुनपुरस्कारासाठी खेळाडूंच्या निवडीवरून वाद वाढतच आहे. हॉकी इंडियाचे महासचवि नरेंद्र बत्रा यांनी पुरस्कार समिती, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि क्रीडा मंत्रालयाविरुद्ध मोहीमच हाती घेतली आहे. बत्रा यांनी या प्रकरणी आरटीआय दाखल करून या वादात तेल ओतण्याचे काम केले. दुसरीकडे अर्जुन पुरस्कारासाठी दुर्लक्षित केल्याने बॉिक्संगपटू मनोज कुमारने क्रीडा मंत्रालयाविरुद्ध न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे.

कपलिदेव महान खेळाडू नििश्चत आहे. मात्र, क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने फक्त फ्लड लाइट विकण्याचे आणि लिावण्याचे काम केले. प्रत्यक्ष क्रिकेटच्या मैदानावर त्याने निवृत्तीनंतर "दिवे ' लावले नाहीत. कपलिने एकही खेळाडू घडवला नाही, असा सनसनाटी आरोप हॉकी इंडियाचे सचवि नरेंद्र बत्रा यांनी लावला आहे. तत्पूर्वी, कपलिदेवने नरेंद्र बत्रा यांच्यावर जोरदार टीका केली. कोण आहे हा नरेंद्र बत्रा? त्याने कधी देशाकडून हॉकी खेळली आहे काय? असा टोला कपलिदेवने मारला होता. कपलिच्या या टीकेमुळे बत्रा चांगलेच नाराज झाले.

या वेळी अर्जुन पुरस्कारासाठी एकाही हॉकीपटूची नवडि झाल्याने बत्रा नाराज होते. अर्जुन पुरस्कारासाठी खेळाडूंची नवडि करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कपलिदेव आहेत. तब्बल सात हॉकीपटूंना दुर्लक्षित केल्याने हॉकी इंडियाचे सचवि नरेंद्र बत्रा यांचा राग अनावर झाला. यानंतर बत्रा यांनी प्रसारमाध्यमांत अर्जुन पुरस्कारासाठी खेळाडूंची नवडि करणाऱ्या समितीवर टीका केली. कपलिदेवला ही टीका झोंबल्याने त्यांनी टीकेस प्रत्युत्तर दिले. पुरस्कारासाठी खेळाडूंच्या यादीत बदल होणार नाही, असे त्यांनी सांिगतले.

मनोजकुमारची धमकी
अर्जुनपुरस्कारार्थींमध्ये नाव अंतर्भूत करण्यात आले नसल्याने अपमानित आणि संतप्त झालेला बॉक्सिंगपटू मनोजकुमारने क्रीडा मंत्रालयाविरुद्ध न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे.