आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kapil Dev News In Marathi, T 20 World Cup, Bangladesh, Divya Marathi

भारत नव्हे, विंडीज वर्ल्डकपचा दावेदार- कपिलदेव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टीम इंडिया टी-20 विश्वचषक जिंकणार नाही. यासाठी वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड संघ प्रबळ दावेदार असल्याचे सूतोवाच भारताचा माजी कर्णधार कपिलदेवने केले. मात्र, भारतीय संघ शुक्रवारी होणा-या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करेल, असा विश्वासही त्याने या वेळी व्यक्त केला. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाक दोन्ही संघ समोरासमोर असतील.


कपिल म्हणाला की, यामुळे भारत जिंकेल टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्ध सामन्यात जिंकण्याची मोठी शक्यता आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या पुनरागमनाचा यात मोठा फरक पडणार आहे.


धोनीचे खास कौतुक
खेळाडू म्हणून महेंद्रसिंग धोनी फार चांगला आहे. आपले पूर्ण लक्ष निश्चित ध्येयावर केंद्रित केल्यास आणि कोणत्याही गोष्टीमुळे विचलित न झाल्यास तो प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरू शकतो, अशा शब्दांत कपिलदेवने माहीचे खास कौतुक केले.


वेगवान गोलंदाजी सर्वात मोठी चिंता
वेगवान गोलंदाजी हा भारतीय संघासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. यात सुधारणा न झाल्यास पूर्ण जबाबदारी फिरकीपटूंवर येईल, हीच चिंतेची बाब आहे, असेही तो म्हणाला.


सलामी फलंदाजांनी केली निराशा :
रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीच्या जोडीवर कपिलदेव फारसा खुश नाही. या जोडीच्या अपयशावरही त्याने नाराजी व्यक्त केली. टीम इंडियाला आपल्या या दुबळ्या बाजूला दूर सारण्याची गरज असल्याचा सल्लाही त्याने दिला.