आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण ठाकूरची भन्‍नाट कामगिरी, एकाच डावात घेतल्‍या 10 विकेट्स; तरीही संघ पराभूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेटमध्‍ये पृथ्‍वी शॉ या फलंदाजाने काही दिवसांपूर्वी एक तुफानी कामगिरी केली होती. त्‍यानंतर आता आणखी एका उदयोन्‍मुख खेळाडूने अफलातून कारनामा केला आहे. रेल्‍वेचा वेगवान गोलंदाज करण ठाकूर याने सी. के. नायड करंडक स्‍पर्धेमध्‍ये एकाच डावात सर्व 10 विकेट्स घेण्‍याचा पराक्रम केला आहे. करणने बडोद्याविरुद्ध ही कामगिरी केली. बडोद्याच्‍याच रिलायंस स्‍टेडियममध्‍ये हा सामना झाला.

करण ठाकूर रेल्‍वेच्‍या अंडर-25 संघात आहे. तो मुळचा दिल्‍लीचा आहे. त्‍याने 28.5 षटकांमध्‍ये 77 धावांच्‍या मोबदल्‍यात बडोद्याचा संपूर्ण संघ गुंडाळला. अशी भन्‍नाट कामगिरी करुनही त्‍याच्‍या संघाला 10 धावांनी पराभव पत्‍कारावा लागला. सी. के. नायडू करंडक स्‍पर्धेला बीसीसीआयची अंडर-25 स्‍पर्धा म्‍हणूनही ओळखले जाते.