आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी मध्‍ये कर्नाटक सातव्यांदा विजयी, महाराष्‍ट्राला उपविजेतेपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - करण नायरने चिराग खुराणाला षटकार खेचताच कर्नाटकने रविवारी रणजी ट्रॉफीचा किताब सातव्यांदा आपल्या नावे केला. राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत कर्नाटकने महाराष्‍ट्रावर 7 गड्यांनी विजय मिळवला.
फायनलमध्ये कर्नाटक सुरुवातीपासून वरचढ राहिला. कर्नाटकने महाराष्‍ट्रावर पहिल्या डावात 210 धावांनी आघाडी घेत विजय निश्चित केला. त्यांना सामन्याच्या निकालासाठी पाचव्या दिवसाची वाट पाहावी लागली. महाराष्‍ट्राने कालच्या 6 बाद 272 धावांच्या पुढे खेळताना 366 धावांवर डाव संपुष्टात आला. यासह कर्नाटकला विजयासाठी 157 धावांचे माफक आव्हान मिळाले. कर्नाटकने 40.5 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. यासह महाराष्‍ट्राची 72 वर्षांनी रणजी ट्रॉफी जिंकण्याची आशा धुळीस मिळाली. कर्नाटकचा सलामीवीर लोकेश राहुल (131, 29) सामनावीर ठरला.
महाराष्‍ट्राच्या अक्षय दरेकर, चिराग खुराणा आणि श्रीकांत मुंढे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. हर्षद खडीवाले, अंकित बावणे, केदार जाधवने संघासाठी केलेली कामगिरी व्यर्थ ठरली.
केदार जाधवच्या सर्वाधिक धावा
महाराष्‍ट्राच्या केदार जाधवने चालू रणजी सत्रात सर्वाधिक धावा आणि सहा शतके ठोकली. त्याने 11 सामन्यांत 1223 धावा काढल्या. यात त्याने एका द्विशतकासह सहा शतके ठोकली. सर्वाधिक धावांच्या यादीत कर्नाटकचा लोकेश राहुल (10 लढतीत 1033 धावा) दुस-या आणि महाराष्‍ट्राचा हर्षद खडीवाले (11 लढतीत 1004 धावा) तिस-या स्थानावर राहिला.
कर्नाटकचे ‘सप्तरंगी’ यश
कर्नाटक वि. महाराष्‍ट्र 2013-14
कर्नाटक वि. मध्य प्रदेश 1998-99
कर्नाटक वि. उत्तर प्रदेश 1997-98
कर्नाटक वि. तामिळनाडू 1995-96
कर्नाटक वि. मुंबई 1982-83
कर्नाटक वि. उत्तर प्रदेश 1977-78
कर्नाटक वि. राजस्थान 1973-74
ऋषी धवनचे 49 बळी
हिमाचल प्रदेशच्या ऋषी धवने सत्रात सर्वाधिक 49 बळी घेतले.रेल्वेचा अनुरीत (44) दुस-या व कर्नाटकचा मिथुन 41 बळींसह तिस-या स्थानावर आहेत.
धावफलक
महाराष्‍ट्र पहिला डाव 305 धावा. कर्नाटक पहिला डाव 515 धावा.
महाराष्‍ट्र कालच्या 6 बाद 272 धावांच्या पुढे.
महाराष्‍ट्र दुसरा डाव धावा चेंडू 4 6
मोटवाणी झे. गौतम गो. मिथुन 21 48 0 0
मुंढे झे. गौतम गो. गोपाल 42 75 3 0
संकलेचा झे. नायर गो. मिथुन 14 19 0 1
दरेकर झे. उथप्पा गो. गोपाल 13 17 2 0
समद फल्लाह नाबाद 02 03 0 0
अवांतर : 24. एकूण : 91.2 षटकांत सर्वबाद 366 धावा. गोलंदाजी : विनयकुमार 29-1-116-4, अभिमन्यू मिथुन 22-1-77-2, अरविंद 21-0-67-0, रॉबिन उथप्पा 2-0-15-0, मनीष पांडे 2-0-14-0, श्रेयस गोपाल 13.2-1-47-4, अमित वर्मा 2-0-20-0.
कर्नाटक दुसरा डाव धावा चेंडू 4 6
उथप्पा झे. खुराणा गो. दरेकर 36 47 6 0
राहुल झे. खुराणा गो. मुंढे 29 66 3 2
अमित वर्मा झे. गो. खुराणा 38 49 6 1
मनीष पांडे नाबाद 28 43 3 0
करुण नायर 20 43 1 1
अवांतर : 6. एकूण : 40.5 षटकांत 3 बाद 157 धावा. गोलंदाजी : समद फल्लाह 11-2-28-0, संकलेचा 3-2-7-0, दरेकर 10-0-46-1, चिराग खुराणा 8.5-0-53-1, श्रीकांत मुंढे 8-1-20-1.