आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूर ओपन बॅडमिंटन : पी. कश्यप, प्रणयची आगेकूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर - भारतीय बॅडमिंटनपटू परुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणय यांनी पुरुष एकेरीत आपापले सामने जिंकून सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, श्रीकांत आणि महिला गटात ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीचा पराभव झाला.

पुरुष एकेरीच्या दुसर्‍या फेरीत विजयी अभियान कायम ठेवताना कश्यपने चौथा मानांकित कोरियाच्या सोन वानला अवघ्या ४६ मिनिटांत २१-१५, २२-२० ने हरवले. इतर एका लढतीत बिगर मानांकित भारताच्या प्रणयने दुसरा मानांिकत डेन्मार्कच्या जॉन ओ जोर्गेनसनला ३३ मिनिटांत २१-१६, २१-८ ने हरवले.

महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला तिसरी मानांकित चिनी जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. वांग शियोली आणि यू यांग यांनी ४० मिनिटांत भारतीय जोडीला २४-२२, २१-१८ ने पराभूत करून स्पर्धेबाहेर केले. क्वार्टर फायनलनमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता कश्यपचा सामना फ्रान्सच्या ब्राइस लेवेरडेज याच्याशी होईल. प्रणयसमोर आता जपानच्या केंटो मोमोटा याचे आव्हान असेल. लेवेरडेजने दुसर्‍या फेरीत सातवा मानांकित डेन्मार्कच्या हास क्रिस्टियन विटिनगूसला २१-१३, १९-२१, २१-१८ ने तर मोमोटोने सहावा मानांकित चीन तैयपैच्या चोअ तिएन चेनला २१-१७, २१-१५ ने पराभूत करून क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवले.

श्रीकांतचा पराभव
स्विस ओपन आणि इंडिया ओपनचा चॅम्पियन तिसरा मानांकित श्रीकांतचा मात्र पराभव झाला. श्रीकांतला बिगर मानांकित थायलंडच्या तानोंगसाक साएनसोंबबूनसूकने ३८ मिनिटांत २१-१५, २२-२० ने पराभूत केले.