Home | Sports | From The Field | katich and clarke scuffle in 2009 costed katich place

मायकल क्लार्कने गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी दाबलेला कॅटीचचा गळा

agency | Update - Jun 09, 2011, 07:31 PM IST

मायकल स्लेटर यांने कर्णधार मायकल क्लार्क आणि सायमन कॅटीच यांच्यात दोन वर्षापूर्वी झालेल्या भांडणामुळे त्याला करारातून वगळण्यात आल्याचे म्हटले आहे.

  • katich and clarke scuffle in 2009 costed katich place

    मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सायमन कॅटीचला ऑस्ट्रेलियाने करारातून बाहेर केले आहे. याविषयी बोलताना माजी खेळाडू मायकल स्लेटर यांने कर्णधार मायकल क्लार्क आणि सायमन कॅटीच यांच्यात दोन वर्षापूर्वी झालेल्या भांडणामुळे त्याला करारातून वगळण्यात आल्याचे म्हटले आहे.

    ऑस्ट्रेलियाने करारबद्ध केलेल्या 25 खेळाडूंच्या यादीतून कॅटीचला वगळण्यात आले आहे. कॅटीचला वगळण्यामागचे कारण देताना स्टेलर म्हणाला, मायदेशात 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना विजयानंतर एका पार्टीत या दोघांमध्ये वाद झाले होते. यांच्यातील वाद एवढा वाढला होता की, या दोघांना संघातील खेळाडूंनी भांडण करण्यापासून रोखले होते. क्लार्कने कॅटीचचा गळा दाबून धरला होता. या दोघांचे भांडण गाणे म्हणण्यावरून झाले होते. गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गाणे लवकरात लवकर संपावे असे क्लार्कचे म्हणणे होते. पण, कॅटीचला क्लार्कची गडबड पसंत नव्हती. यातून या दोघांचे वाद झाले.

Trending