आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळच्या ‘साई’तील वीस खेळाडू रजेवर, बारा महिलांचाही अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलापुझा - केरळच्या साई हॉस्टेलमधील महिला खेळाडूंच्या मृत्यूनंतर अनेक खेळाडूंना मानसिक धक्का बसला आहे. २० पुरुष खेळाडू साई प्रशासनाकडून सुटी घेऊन घरी गेले आहेत, तर १२ महिला खेळाडूंनी सुटी मागितली आहे. साईचे महासंचालक इंजेती श्रीनिवासन म्हणाले, सर्व खेळाडूंना नातलगांसह घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. पण सर्वांना शुक्रवारपर्यंत परत येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, तर आव्हानांचा सामना करणे गरजेचे आहे. साईचे केंद्र बंद केलेले नाही. येथे एकूण ५५ खेळाडू आहेत.

‘मुलींचीही चूक?’
पोलिस, मानवाधिकार आयोग आणि इतर संस्था या प्रकरणाची चौकशी करत आहेत. कारण स्पष्ट होईल. पण विष प्राशन करणाऱ्या खेळाडूंचीही चूक असू शकते.
बातम्या आणखी आहेत...