आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसएमएस कांडानंतर पीटरसनचा माफीनामा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- इंग्लंडच्या स्टार फलंदाज केविन पीटरसनने दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना पाठवलेल्या आक्षेपार्ह एसएमएसप्रकरणी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाची (ईसीबी)माफी मागितली आहे.
हेडिंग्ले येथे झालेल्या दुसर्‍या कसोटीत 149 धावांची खेळी केल्यानंतर देखील पीटरसनला लॉर्डसवर होणार्‍या तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून संघाबाहेर केले आहे. पीटरसनने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंना एसएमएस पाठवले होते. यात त्याने इंग्लंडचा कर्णधार अँण्ड्रयू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवरबद्दल अवमान केला होता. 'पीटरसनने माफी मागितल्याचे मी ऐकले आहे. मात्र ईसीबीने याबाबत आणखी कोणतीही माहिती दिलेली नाही,'असे माजी कर्णधार अँलेक स्टिवर्टने म्हटले. 'माझे आणि पीटरसनचे संबंध चांगले आहेत. मी नेहमी त्याच्याशी सलगीने वागतो. तो सुद्धा माझ्यासोबत चांगला वागतो. मला त्याच्या एसएमएस प्रकारामुळे धक्काच बसला,' असे स्ट्रॉस म्हणाला.