आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुखापतीमुळे पीटरसन आयपीएलला मुकणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍सला आयपीएल सुरू होण्‍यापूर्वीच जोरदार झटका बसला आहे. त्‍यांचा स्‍टार फलंदाज केविन पीटरसनला गुडघ्‍याच्‍या दुखापतीमुळे या स्‍पर्धेतून माघार घ्‍यावी लागली आहे. पीटरसन न्‍यूझीलंड दौ-यात जखमी झाला आहे, त्‍यामुळे त्‍याला क्रिकेटपासून सहा ते आठ आठवडे दूर राहावे लागणार आहे. तो न्‍यूझीलंडविरूद्ध ऑकलंड येथे सुरू होणा-या तिस-या कसोटीतही खेळू शकणार नाही.

न्‍यूझीलंडविरूद्धच्‍या कसोटीपूर्वी क्‍वीन्‍सटाऊनमध्‍ये चारदिवसीय सराव सामन्‍यावेळी त्‍याच्‍या गुडघ्‍याला दुखापत झाल्‍याचे इंग्‍लंड आणि वेल्‍स क्रिकेट बोर्डाने म्‍हटले. आयपीएलच्‍या सहाव्‍या सत्रातील पहिला सामना तीन एप्रिल रोजी ईडन गार्डन्‍स येथे विद्यमान चॅम्पियन कोलकाता नाईटरायडर्स आणि दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍स यांच्‍यादरम्‍यान होणार आहे. पीटरसन यापूर्वी 2011 साली डेक्‍कन चार्जर्सकडून आयपीएलमध्‍ये खेळू शकला नव्‍हता. मात्र, 2012 साली दिल्‍लीकडून त्‍याने आयपीएल सामने खेळले होते.