आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवीन पीटरसनच्या क्रिकेट कारकीर्दीची सांगता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंडचा प्रख्यात फलंदाज केवीन पीटरसन याने त्याच्या क्रिकेट करिअरमधून संन्यास घेत असल्याची घोषणा बुधवारी केली. विंडीजविरुद्धचा दौरा तसेच त्यानंतरच्या टी - 20 वर्ल्डकपमधून संघातून गच्छंती झाल्याने यापुढे इंग्लंडसाठी क्रिकेट खेळणार नसल्याचे जाहीर केल्याने पीटरसनच्या वादग्रस्त करिअरची अखेर सांगता झाली आहे.
अँशेस मालिकेत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडच्या संघातून त्याची गच्छंती करण्यात आली होती. त्या पाश्र्वभूमीवर संघाच्या पुनर्बांधणीत पीटरसनला स्थान नसल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने म्हटल्यानंतर पीटरसनने त्याचा निर्णय जाहीर केला.
भारताविरुद्धची नेहमीच केपीची बॅट तळपली..
पीटरसनची भारताविरुद्धची कामगिरी नेहमीच आकर्षक राहिली आहे. त्याने कसोटीत भारताविरुद्ध 58.55 इतक्या सरासरीने 1581 धावा फटकावल्या असून एकदिवसीय सामन्यात 45 च्या सरासरीने 1138 धावा केल्या आहेत. त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये त्याने 104 कसोट्या आणि 136 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
देशासाठी खेळणे सन्मान
इंग्लंडसाठी क्रिकेट खेळणे हा मी कायमच माझ्यासाठी सन्मान मानत आलो आहे. त्यामुळे मला थांबावे लागत असल्याबद्दल मला खूपच वाईट वाटत आहे. गत नऊ वर्षांमध्ये संघाचा सदस्य बनून आम्ही जे काही मिळवले त्याचा मला अभिमान असल्याचेही पीटरसनने नमूद केले आहे.