आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kevin Pietersen To Join Sunrisers Hyderabad For Ipl 2015

इंग्लंडच्या संघात स्थान न मिळाल्याने पीटरसन नाराज, IPL मध्‍ये खेळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्टस डेस्क - इंग्लंड क्रिकेट संघात स्थान न मिळाल्याने दु:खी केविन प‍ीटरसन आता आयपीएल-8 मध्‍ये खेळण्‍याची तयारी करित आहे. तो शुक्रवारी(ता.15) भारतात येणार आहे. पीटरसन आयपीएलमध्‍ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा खेळाडू आहे. कौंटी क्रिकेटमध्‍ये त्रिशतक ठोकूनही पीटरसनला आगामी अॅशेज मालिकेत इंग्लंड संघात स्थान मिळालेले नाही.
करारानुसार सनरायझर्स हैदराबादने मला कौंटी खेळण्‍यास परवानगी दिली होती. त्यांना मला परत बोलवण्‍याचाही अधिकार आहे. या कारणामुळे आता त्यांच्या म्हणण्‍यानुसार मी आयपीएल खेळणार आहे. हा माझ्यासाठी दुःखातून बाहेर निघण्‍याची चांगली संधी आहे, असे पीटरसनने सांगितले.

पीटरसनसाठी 2 कोटींची बोली
2015 आयपीएलच्या लिलावात पीटरसनला सनरायझर्स हैदराबादने दोन कोटी रुपयांमध्‍ये खरेदी केले होते. परंतु त्याने इंग्लंड संघात निवड व्हावी यासाठी आयपीएल ऐवजी कौंटी खेळण्‍याचा निर्णय घेतला होता. आता राष्‍ट्रीय संघात स्थान न मिळाल्याने तो आयपीएलमध्‍ये खेळणार आहे.
सनरायझर्सची ताकद वाढणार
पीटरसन संघात आल्यास सनरायझर्स हैदराबादला फलंदाजीत फायदा होऊ शकतो. त्रिशतक करुन त्याने आपल्या क्षमतेची जाणीव करुन दिली आहे. आता हैदराबाद फलंदाजीसाठी डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन आणि हेन्रीक्सवर अवलंबून आहे. पीटरसन आल्याने यास आणखी ताकद मिळणार आहे.
बाकी आहेत दोन सामने
आता 12 पैकी सात सामने सनरायझर्स हैदराबाद संघाने जिंकून गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. संघास इतर दोन सामने खेळावे लागणार आहे. शुक्रवारी (ता.15) हैदराबादचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुशी होणार आहे. पीटरसन या सामन्यात खेळण्‍याची शक्यता फार कमी आहे. मात्र 17 मे च्या मुंबई इंडियन्सविरुध्‍द होणा-या सामन्यात पीटरसन हैदराबाद जर्सीत मैदानावर खेळताना दिसू शकतो.
पुढील स्लाइड्सवर पाहा आयपीएलमधील केविन पीटरसनची कामगिरी