आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kevin Pietersen To Miss England's Test Series Against New Zealand To Aid Recovery From Knee Injury

पीटरसन न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतून बाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- इंग्लंडचा स्टार फलंदाज केविन पीटरसन उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतून बाहेर पडला. मे महिन्यात इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका होणार आहे, अशी माहिती इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) मंगळवारी दिली.

गेल्या महिन्यात न्यूझीलंड दौ-यावर पीटरसनला सरावादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. तो तिस-या कसोटीत खेळू शकला नाही. अद्याप पीटरसन दुखापतीतून सावरलेला नाही. येत्या आठवड्यात होणा-या तपासणीनंतर तो सरावाला कधी प्रारंभ करेल हे निश्चित होईल,असे इसीबीने सांगितले.