आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशियाई स्पर्धा: खुशबीरला रौप्य; राजीव, मंजूला कांस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - भारतीय खेळाडूंनी एशियन गेम्समध्ये शानदार कामगिरी करताना अ‍ॅथलेटिक्समध्ये रविवारी एक रौप्य आणि ३ कांस्यपदके जिंकली. २० किमी पायी चालण्याच्या स्पर्धेत खुशबीर कौरने रौप्यपदक जिंकले. यानंतर ४०० मीटर शर्यतीत भारतीय पुरुष अरोकिया राजीव आणि महिला खेळाडू एम. पुवम्मा यांनी कांस्यपदक जिंकले. मंजू बालाने हॅमर थ्रोमध्ये (हातोडाफेक) कांस्य जिंकून भारताचा आनंद द्विगुणित केला.

खुशबीर आणि चीनची लू जियुझी यांच्यात संपूर्ण २० किमीपर्यंत जोरदार संघर्ष रंगला. या दोन्ही खेळाडूंना जियोन यिओनग्युनने तगडे आव्हान दिले. चिनी खेळाडूने एक तास ३१ मिनिटे आणि ६ सेकंदांच्या वेळेसह सुवर्ण जिंकले. तर खुशबीरने एक तास ३३ मिनिटे ७ सेकंदांसह रौप्यपदक मिळवले. अरोकिया राजीवने पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४५.९२ सेकंदांचा आपला सर्वश्रेष्ठ वेळ काढताना कांस्यपदक जिंकले. सऊदी अरबच्या मसराही युसूफ अहमदने ४४.४६ सेकंदांसह सुवर्णपदक मिळवले. भारताचा आणखी एक धावपटू कुन्हू मोहंमद ४६.५३ सेकंदांच्या वेळेसह सातव्या स्थानी आला. महिलांच्या ४०० मीटर शर्यतीत पुवम्मा राजूने ५२.३६ सेकंदांसह कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत बहरीनच्या ऐदेकोया ओलुवाकेमी मुजिदातने ५१.५९ सेकंदांसह सुवर्ण जिंकले.

मनदीप कौर, इरफान अपयशी
मनदीप कौरने ५३.३८ सेकंदांचा वेळ घेत आठ खेळाडूंत सहावे स्थान मिळवले ३ पुरुषांच्या २० किमी पायी चालण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडू टी. इरफानने एक तास २३ मिनिटे आणि १८ सेकंदांच्या वेळेसह पाचवे स्थान मिळवले. कृष्णन गणपतीला अपात्र ठरवण्यात आले.