आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kidambi Srikanth, Parupalli Kashyap Advance In Singapore Open

पी. कश्यप, प्रणॉय दुसर्‍या फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर - कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन असलेल्या पुरुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉय यांनी एकेरीत, तर अश्विनी पोनप्पा-ज्वाला गुट्टा यांनी दुहेरीत प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सिंगापूर ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला.

कश्यपने कोरियाच्या ली ह्युनवर २१-११ आणि २१-१३ अशी मात केली. त्यामुळे आता कश्यपचा सामना चौथ्या सिडेड कोरियाच्याच सोन वॅन हो याच्याशी रंगणार आहे, तर प्रणॉयने हाँगकाँगच्या वाँग विंग की विन्सेंट याला २१-१५ आणि २१-१७ असे पराभूत केले. गतवेळच्या कांस्यपदक विजेत्या अश्विनी आणि ज्वाला गुट्टा या जोडीने कोरियाच्या गो आह राह- यो हाई वोन या जोडीचा २१ -१२, २१- १६ असा पराभव केला. मात्र, गुरुसाईदत्त आणि तुलसी यांना एकेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

पुन्हा नंबर वन बनणार : सायना नेहवाल
वर्ल्ड नंबर वनचा ताज गेल्याचे भारतीय फुलराणी सायना नेहवालला कोणतेही दु:ख नाही. पुन्हा अव्वल क्रमांकावर विराजमान होण्याचा तिला विश्वास आहे. अशा अनेक संधी मिळतील, जेव्हा मी चांगली कामगिरी करेन. मी सलग चांगला खेळ केला आणि फिटनेस राखला तर पुन्हा नंबर एकवर विराजमान होऊ शकते. चिनी खेळाडू विजयाचे भुकेले आहेत. त्यांचा सामना करणे कठीण असते, असे सायना म्हणाली.